सलमान खानच्या बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 26, 2016 13:06 IST2016-10-26T13:06:01+5:302016-10-26T13:06:01+5:30
बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलीस ठाण्यात शेराविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सलमान खानच्या बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलीस ठाण्यात शेराविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेराने अंधेरीतील गुलमोहर रोडवरील हुक्का पार्लरमध्ये वेटरला मारहाण केली होती. रात्री 2.30 वाजता ही मारहण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याप्रकरणीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेराने धमकी देत गनचा वापर केला तसंच आपल्या मानेचं हाड तोडल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तर शेराने मात्र आपली फक्त शाब्दिक बाचाबाची झाल्याचा दावा केला आहे.
शेरा गेल्या 18 वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड असून सलमानमुळेच तो प्रसिद्धीझोतात आला होता. सलमानच्या करिअरमधील सर्व चढ उतारांवेळी शेराने सलमानला साथ दिली आहे.