शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 23:49 IST

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिथूनच छगन भुजबळांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदारांना संबोधित केले.

Chhagan Bhujbal News: नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत. महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. नेत्यांची विधानेही गाजत असल्याचे दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी थेट रुग्णालयातून प्रचारसभेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप असलेल्या अवस्थेत छगन भुजबळ यांनी मतदारांना भावनिक आवाहन केल्याचे म्हटले जात आहे. 

सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. छगन भुजबळ यांनी रुग्णालयातून येवलावासियांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप लावलेल्या छगन भुजबळांनी हातात भाषणाचा कागद घेऊन मतदानाचे आवाहन केले.

विकासाच्या मुद्द्यावर इथे आलो आणि विकासकामे केली

माझी इच्छा असताना नगरपरिषद निवडणुकांमध्ये सहभाग घेता आला नाही. विकासाच्या मुद्द्यावर इथे आलो आणि विकासकामे केली. २००४ मध्ये मला काम करण्याची, सेवा करण्याची संधी येवल्यात मिळाली. हजारो कोटी रुपयांची कामे करायला मिळाली. त्यासाठी आपली साथ होती. अनेक कामे मतदारसंघात केली, म्हणून तुम्ही मला ५ वेळा निवडून दिले. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्वच उमेदवारांना आपण निवडून द्याल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, आगामी काळात विकासकामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्याकडे पोहोचला आहे. येवल्यात नसलो तरी समीर पंकज येवल्यात रात्रंदिवस काम करत आहेत. मला जे प्रेम दिले ते महायुतीच्या उमेदवारांना प्रेम द्या, असे सांगत, संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है| सवाल जहर का नहीं था, वो तो मै पी गया, तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया, अशी शेरोशायरी भुजबळांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhujbal campaigns from hospital with saline, oxygen; gets emotional.

Web Summary : Chhagan Bhujbal, hospitalized, addressed voters via video, appealing for support in upcoming Nagar Parishad elections. He emphasized past development work and urged voters to back the Mahayuti candidates, expressing confidence in their victory.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस