सलिम खान यांनी शौचालयाविरोधात घेतली महापौरांकडे धाव

By Admin | Updated: May 9, 2017 02:39 IST2017-05-09T02:39:37+5:302017-05-09T02:39:37+5:30

हागणदारीमुक्त मुंबई मोहिमेचा सदिच्छा दूत अभिनेता सलमान खानचे पिता व प्रसिद्ध पटकथा लेखक सलिम खान यांनी वांद्रे बँडस्टँड

Salim Khan took to the Mayor against the toilets | सलिम खान यांनी शौचालयाविरोधात घेतली महापौरांकडे धाव

सलिम खान यांनी शौचालयाविरोधात घेतली महापौरांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हागणदारीमुक्त मुंबई मोहिमेचा सदिच्छा दूत अभिनेता सलमान खानचे पिता व प्रसिद्ध पटकथा लेखक सलिम खान यांनी वांद्रे बँडस्टँड येथील सार्वजिनक शौचालयास विरोध केला आहे. त्यांच्या घरासमोरील हे शौचालय हटविण्यासाठी ते व अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. महापौरांनी या तक्रारीची दखल घेत या प्रकरणात स्थानिक रहिवाशांची सुनावणी घेण्याची सुचना अधिकाऱ्यांना केली आहे.
वांद्रे पश्चिम येथे महापालिकेने तीन शौचालय बांधली आहेत. त्यापैकी एक शौचालय सलमानच्या बँडस्टँड येथील निवासस्थानासमोर बांधण्यात आले आहे.
याप्रकरणी उलटसुलट प्रतिक्रया उमटत आहेत. तर सलिम खान यांच्या मागणीनुसार शौचालय हटविण्यास यापूर्वी महापालिकेने नकार दिला होता. परंतु सोमवारी पुन्हा त्यांनी महापौरांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. कोणत्याही विभागात नवीन बदल करताना तेथील रहिवाशांकडून हरकती व सुचना मागविणे आवश्यक होते, असे मत महापौरांनी व्यक्त
केले आहे.

Web Title: Salim Khan took to the Mayor against the toilets