शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मार्चमधील कपात केलेला पगार गणेशोत्सवापूर्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:50 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाल्याने मार्चमधील पगार दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारीकर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मार्चमधील पगाराची दुसऱ्या टप्प्यातील रक्कम त्यांना गणेशोत्सवापूर्वी (२२ आॅगस्ट) देण्यात येणार आहे. वित्त विभागाने मंगळवारी या बाबतचा आदेश काढला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाल्याने मार्चमधील पगार दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, लोकप्रतिनिधी/ पदाधिकाऱ्यांना ४० टक्के, गट अ आणि ब च्या अधिकाºयांना ५० टक्के तर गट क च्या कर्मचाºयांना ७५ टक्के पगार देण्यात आला होता. त्यांचा अनुक्रमे ६० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के पगार हा दुसºया टप्प्यात दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. ऐन कोरोनाच्या संकटकाळात सरकारने कर्मचाºयांच्या पगारात कपात केली, अशी टीका विरोधकांनी केली होती.‘शिक्षक, शिक्षकेतर’चा वेतनआयोगाचा हप्ता लांबणीवरराज्यातील शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सातव्या वेतन आयोगाचा देय दुसरा हप्ता एक वर्ष न देण्याचा निर्णय घेतला आहे. मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, सैनिकी शाळा यामधील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालिका, नगरपालिका, नगर पंचायती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जुलै २०२० रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या दुसºया हप्त्याचे प्रदान एक वर्ष पुढे ढकलल्याचे आदेशात म्हटले आहे.१९ हजार कोटी मिळाले, आता महागाई भत्ता द्या!राज्याला केंद्राकडून जीएसटीपोटी १९ हजार कोटी रुपये मिळाल्याने आता राज्य कर्मचाºयांची महागाई भत्त्याची ११ महिन्यांची थकबाकी तातडीने देण्यात यावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे केली . जानेवारी ते जून आणि जुलै ते नोव्हेंबर २०१९ दरम्यानही ही थकबाकी आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस