अकोल्यात सव्वाशे किलो गोवंश मांस जप्त
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:20+5:302016-03-16T08:38:20+5:30
पातूर तालुक्यातील घटना; गोवंशाची कत्तल करणा-या इसमाच्या घरावर पोलिसांचा छापा

अकोल्यात सव्वाशे किलो गोवंश मांस जप्त
अकोला : पातूर तालुक्यातील शिरपूर येथे अवैधरीत्या गोवंशाची कत्तल करणार्या इसमाच्या घरावर चान्नी पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून १२५ किलो मांसासह ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.
शिरपूर येथे अवैधरीत्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती चान्नी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी शिरपूर येथील कत्तलखान्यावर छापा मारला. तेथे १२५ किलो मांस आढळून आले; परंतु आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पोलिसांनी शे. उस्मान शे. बुरहान, शे. लुकमान शे. बुरहान व शे. इस्माईल शे. बुरहान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.