'अच्छे दिन'ची खिल्ली उडवली म्हणून भाजीवाल्याच्या डोक्यात दगड
By Admin | Updated: February 8, 2017 13:08 IST2017-02-08T12:10:38+5:302017-02-08T13:08:14+5:30
उस्मानाबादमध्ये एका भाजी विक्रेत्याला अच्छे दिन या घोषणेची खिल्ली उडवणं चांगलंच अंगलट आलं.

'अच्छे दिन'ची खिल्ली उडवली म्हणून भाजीवाल्याच्या डोक्यात दगड
>ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 8 - उस्मानाबादमध्ये एका भाजी विक्रेत्याला अच्छे दिन या घोषणेची खिल्ली उडवणं चांगलंच अंगलट आलं. अच्छे दिनची खिल्ली उडवली म्हणून एका तरूणाने त्या भाजी विक्रेत्यावर हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात दगड घातला.
शनिवारी (दि.4) ही घटना येथील आनंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. येथील एक भाजी विक्रेता शिवाजी नागनाथ नारायणकर हा अच्छे दिन आले, बटाट्याचा भाव 10 रूपयांनी पडला असं जोर-जोरात ओरडत होता. हे ऐकून तेथून जाणा-या काशीनाथ देशमुख नावाच्या तरूणाचा पारा चढला आणि त्याने शिवाजी यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये शिवाजी हे जखमू झाले त्यांच्या डोक्यातून रक्त यायला लागलं. आयपीसी कलम 324 नुसार आनंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचा नारा दिला होता.