मानवतेसाठी संतांनी सत्त्व पेरले
By Admin | Updated: May 9, 2016 00:24 IST2016-05-09T00:24:59+5:302016-05-09T00:24:59+5:30
महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही

मानवतेसाठी संतांनी सत्त्व पेरले
निगडी : महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माऊली ज्येष्ठ नागरिक संघ व तुळजामाता मित्र मंडळाच्या वतीने आकुर्डीत आयोजित केलेल्या १२व्या माऊली व्याख्यानमालेचे ‘आजचा युवक’ या विषयावर पुष्प गुंफताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे संस्थापक वा. ना. अभ्यंकर होते. या वेळी माजी नगरसेवक धनंजय काळभोर, हभप किसनमहाराज चौधरी, कार्याध्यक्ष मोहन कर्जुले, प्रमुख समन्वयक बाबूराव इंगवले, खजिनदार नागेश तितर आदी उपस्थित
होते.
व्याख्यानमाला म्हणजे वृद्धांना तरुण होण्याची संधी असते. कार्यक्रमापेक्षा मनाचे उद्घाटन आवश्यक आहे. मन उघडे ठेवून व्याख्यान आत्मसात करणे गरजेचे आहे. पाण्याची शुद्धता क्लोरिन करते; तसेच मनाची शुद्धता व्याख्यानातून होत असते, असे वा. ना. अभ्यंकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाल व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन मान्यवरांचा सत्कार झाला. या वेळी हभप किसनमहाराज चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत गळगट्टे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)