आळंदीला उभारणार संत विद्यापीठ !
By Admin | Updated: March 26, 2015 23:04 IST2015-03-26T23:04:06+5:302015-03-26T23:04:06+5:30
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आळंदी येथे संत विद्यापीठ उभारण्याचा आराखडा तयार करण्यात यावा.
आळंदीला उभारणार संत विद्यापीठ !
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आळंदी येथे संत विद्यापीठ उभारण्याचा आराखडा तयार करण्यात यावा. त्यानुसार प्रस्ताव सादर केल्यास सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक बाळासाहेब भारदे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. आयुष्यभर त्यांनी समाजसेवा केली. भारदे यांच्या स्मरणार्थ आळंदी येथे संत विद्यापीठ उभारण्याची मागणी माजी सभापती व आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
त्यावर अर्थसंकल्पावरील भाषणाला उत्तर देताना या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येणार येईल. त्याविषयी विस्तार
आराखडा तयार करावा लागेल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बुधवारी दिले. (प्रतिनिधी)