शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

संशोधनाची प्रेरणा देणारे संत नामदेव अध्यासन

By admin | Updated: April 2, 2015 03:14 IST

त त्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी महाराष्ट्रात या कार्याला वाहिलेले संत नामदेव अध्यासन असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त त्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी महाराष्ट्रात या कार्याला वाहिलेले संत नामदेव अध्यासन असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ती अमलात आणली. १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (तेव्हा पुणे विद्यापीठ) संत नामदेव अध्यासनाची स्थापना झाली. प्राचीन व मध्ययुगीन साहित्याचे अभ्यासक, संत नामदेव समाजातील मान्यवर, अनुसूचित जमातीतील तज्ज्ञ, शीख समाजाचे प्रतिनिधी आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी अशी एक सर्वसमावेश जाणकारांची समिती विद्यापीठाने नेमली व ध्येयधोरणे ठरवली. २ नोव्हेंबर १९८५ला पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. विद्यापीठातील अध्यासन हे विद्यापीठ आणि समाज यांना एकत्र आणणारे एक संशोधन केंद्र असते. डॉ. अशोक कामत यांनी ही जाणीव ठेवून संत नामदेव अध्यासनाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले. अनेक नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळविले. अध्यासनाचे ग्रंथालय सुसज्ज केले. अध्यासनाच्या ग्रंथालयात सुमारे दहा हजारांहून अधिक दुर्मिळ असे संशोधनमूल्य असलेले संदर्भग्रंथ आहेत. भारतीय संत साहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. संशोधन सहायक डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांच्यासह डॉ. सुमती देशपांडे, डॉ. सुनीती तांबे, डॉ. पद्मावती श्रोत्रीय, डॉ. आशा परांजपे, डॉ. अनिता केळकर, डॉ. आशा राशिंगकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. सरोज सबनीस इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. परमहंस श्रीस्वामी स्वरूपानंद मंडळ व कै. मधुसूदन अच्युत केळकर ट्रस्ट या संस्थाच्या निधीतून अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. डॉ. वि. रा. करंदीकर, प्रा. पां. ना. कुलकर्णी, डॉ. द. गं. कोपरकर, डॉ. ग. वा. तगारे, श्री. कृष्णा मेगसे, प्रा. श्री. मा. कुलकर्णी, डॉ. प्र. न. जोशी, श्री. रवींद्र भट, डॉ. बालाजी तांबे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. श्रीपाल सबनीस इत्यादी मान्यवरांना आजवर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. आजवर श्री. प्र. द. निकते, डॉ. विलास खोले, प्रा. वा. ल. मंजूळ यांना हे पुरस्कार व शिष्यवृती देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. ही धुरा मी सांभाळत असताना पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ एकोणिसाव्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली. ‘भारतीय धर्म-संप्रदाय, तत्त्वज्ञान आणि साहित्य’ यावर व्याख्यानमाला घेतली. ‘नामदेव साहित्यावरील लेखनसूची’लाही प्रारंभ केला आहे. (लेखक संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख आहेत.)