शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Chipi Airport : सिंधुदुर्गात असलेल्या विमानतळाचं नाव Chipi कसं पडलं? वाचा त्यामागचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 4:01 PM

बड्या व्यक्तींच्या नावाचा आग्रह न धरता याला चिपी विमानतळ असं का संबोधलं जातं असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. 

ठळक मुद्देबड्या व्यक्तींच्या नावाचा आग्रह न धरता याला चिपी विमानतळ असं का संबोधलं जातं असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. 

Chipi Airport : २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चिपी परूळे विमावतळ प्रवाशांच्या सेवेसेसाठी सज्ज झालं आहे. कोंकणवासीयांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे, परंतु या विमानतळासाठी मोठ्या व्यक्तींच्या नावाचा आग्रह न धरता चिपी विमानतळ (Chipi Airport)असं का संबोधण्यात येतं हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. त्यामुळे या नावामागे काय रंजक इतिहास आहे, तेदेखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.

या विमानतळाचा उल्लेख 'चिपी परूळे' असा करण्यात येणार आहे. यामागचं कारण म्हणजे हे विमानतळ परूळे गावातील चिपी वाडी या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. चिपी हा परुळे गावाचाच एक भाग असून यापूर्वी ते पूर्वी एक पठार होते. आता याच ठिकाणी हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. या विमातळावर आता आंतरराष्ट्रीय विमानंही उतरणार आहेत. राजकारणापलीकडे विचार केल्यास हे विमानतळ कोकणच्या विकासाला गती देणारे ठरणार आहे. ते अशासाठी की पर्यटन वृद्धीसह आंबा, काजू आणि मत्स्योत्पादनाला थेट जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.

बांधकाम कोणी केलं?'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (९५ वर्षे) या तत्त्वावर सिंधुदुर्ग विमानतळाच्या उभारणीसाठी एमआयडीसीने २००९ साली निविदा काढली. आय.आर.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट कंपनीने ती जिंकली. २०१२ साली पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर चिपी विमानतळाचे काम पूर्ण करण्यात आले. कोरोनामुळे उद्घाटन रखडले. मार्च २०२१ मध्ये डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीबाबत आक्षेप घेतल्याने आणखी विलंब झाला. धावपट्टीची दुरुस्ती केल्यानंतर आता चिपी विमानतळ विमान प्रचलनासाठी सज्ज झाले.

आकारमान

  • २७५ हेक्टर व्याप्ती
  • २५०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद धावपट्टी
  • एअरबस ए-३२० आणि बोईंग ७७७ प्रकारातील विमाने उतरू शकतात
  • १० हजार चौरस फुट टर्मिनल बिल्डिंग
  • एकावेळी २०० प्रवाशांचे आगमन आणि २०० प्रवाशांचे निर्गमन हाताळण्याची क्षमता
  • तीन विमाने पार्क करण्याची सोय. दुसऱ्या टप्प्यात ती १५ पर्यंत वाढविली जाणार.
  • नाईट लँडिंग आणि इंधन भरण्यासाठी व्यवस्था
टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळMaharashtraमहाराष्ट्र