सैफ अली खान कोर्टात
By Admin | Updated: April 7, 2015 04:44 IST2015-04-07T04:44:48+5:302015-04-07T04:44:48+5:30
मारहाणीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात बुधवारी अभिनेता सैफ अली खानने महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली़ या खटल्याला हजर

सैफ अली खान कोर्टात
मुंबई : मारहाणीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात बुधवारी अभिनेता सैफ अली खानने महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली़ या खटल्याला हजर न राहिल्याने सरकारी पक्षाच्या विनंतीनुसार गेल्या सुनावणीला न्यायालयाने सैफविरोधात वॉरंट जारी केले होते़ त्यामुळे सैफ न्यायालयात हजर राहिला. ही घटना २२ फेब्रुवारी २०१२ रोेजी घडली़ त्या दिवशी सैफ हा त्याची पत्नी करिना, तिची बहीण करिष्मा कपूर व इतर मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता़ तेथे त्याचा दक्षिण अफ्रिकेतील व्यावसायिक इक्बाल शर्मा व त्यांचा सासरा रमन पटेल यांच्याशी वाद झाला़ त्या वेळी सैफ व त्याचा मित्र शकील लडाक आणि बिलाल अमरोही यांनी मारहाण केल्याची तक्रार शर्मा यांनी पोलिसांत नोंदवली़ यात सैफला अटकेनंतर जामीन देखील मंजूर झाला़ गेल्यावर्षी पोलिसांनी याबाबत आरोपपत्र दाखल केले़ तर १३ मार्च २०१४ रोजी न्यायालयाने सैफ व या दोघांवर आरोप निश्चित केले़ (प्रतिनिधी)