शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

साईचरणी नाण्यांचा खच, बँकांनाही सोसवेना भार, बँकेखालील व्यावसायिकांना छत कोसळण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:06 IST

Shirdi News:

- प्रमोद आहेरशिर्डी (जि. अहमदनगर) : साई संस्थानच्या बँकांतील ठेवींच्या आलेखाबरोबरच दानात आलेल्या नाण्यांचा बँकेकडील साठाही वाढतो आहे. नाण्यांच्या समस्येने शिर्डीतील सर्वच राष्ट्रीयीकृत बँका मेटाकुटीला आल्या आहेत. चार बँकांनी नाण्यांच्या धास्तीने संस्थानच्या ठेवीच्या मोहावरही पाणी सोडले आहे. यामुळे संस्थान लवकरच अन्य बँकांमध्ये खाते उघडणार आहे. काही बँकांचा संस्थानकडे यासाठी प्रस्ताव आला आहे. 

शिर्डीतील डझनभर व नाशिकच्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत संस्थानचे खाते आहे. यात २६०० कोटींच्या ठेवी आहेत. साई संस्थान आठवड्यातून दोनदा देणगीची मोजदाद करते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बँकेला निमंत्रित करण्यात येते. दानातील नोटा व नाणी मोजून बँक घेऊन जाते. या रकमा बचत व ठेवीच्या रूपांत ठेवण्यात येतात. 

प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड-दोन कोटींची नाणी साचल्याने जागा अपुरी पडत आहे. नाणी बँकेत पडून असतात; मात्र त्यावर संस्थानला तसेच रक्कम बँकेत रोखीने ठेवल्याबद्दल आरबीआयला व्याज द्यावे लागते. नाण्यांवर प्रत्येक बँकेला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो. नाण्यांसाठी कापडी पिशव्यांचा खर्चसुद्धा बँकांनाच करावा लागतो. आता तर संस्थानने पैसे मोजणी मशीनही बँकांकडूनच देणगीरूपात मागितल्याचे कळते. बँकेकडील अतिरिक्त नाणी आरबीआयने स्वीकारली तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.  

वर्षाला साडेतीन कोटींची नाणी आठवड्यातून दोनवेळा नाण्यांची मोजदाद होते. दोन्हीची मिळून आठवड्याला ७ लाख रुपयांची नाणी जमा होतात. त्यानुसार एक वर्षाला साधारपणे ३ कोटी ६४ लाख रुपये रुपये जमा होतात.

तीन ट्रक नाणीछत्रपती कॉम्प्लेक्समध्ये कॅनरा बँक पहिल्या मजल्यावर आहे.  छतापर्यंत भरलेल्या त्यांच्या स्ट्राँगरूममध्ये किमान तीन ट्रक नाणी असतील. त्यामुळे खालील दुकानदारांना छत कोसळण्याची भीती मांडतात. बँकांमधील नाण्यांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - राहुल जाधव, सीईओ, साई संस्थान

टॅग्स :shirdiशिर्डीMONEYपैसाbankबँक