शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा ‘अनुवाद पुरस्कार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:52 IST

सोमवारी दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिका सई परांजपे यांना ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१९’ जाहीर झाला आहे. सोमवारी दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. २३ भाषांमध्ये साहित्यिकांना विविध साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले.सई परांजपे यांच्या ‘आणि मग एक दिवस’ या साहित्यकृतीला अनुवाद पुरस्कार घोषित झाला असून याची पॉप्युलर प्रकाशनने निर्मिती केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची आत्मकथा असलेल्या ‘अ‍ॅण्ड देन वन डे’ या साहित्यकृतीचा अनुवाद ‘आणि मग एक दिवस’ या साहित्यकृतीत करण्यात आला आहे. मराठी भाषेतील अनुवादित साहित्य पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार आणि निशिकांत ठाकर यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.सई परांजपे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, पटकथा लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, तसेच इंग्रजीत अनेक नाटक,बालनाट्येदेखील केली आहेत. ‘जास्वंदी’, ‘सख्खे शेजारी’ आणि ‘अलबेल’ ही त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली सर्वात गाजलेली नाटके आहेत. नाटक आणि सिनेमातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. नाटक, सिनेमात अष्टपैलू कलाकार असण्याव्यतिरिक्त परांजपे या रेडिओ निवेदिका, माहितीपट दिग्दर्शिका, तसेच सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.आनंदाचा क्षणसाहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्काराच्या घोषणेने आत्यंतिक आनंद झाला आहे. अनुवादित साहित्यात रुळण्याचा स्वभाव नाही, पण नसिरुद्दीन शाह यांच्या विनंतीमुळे या पुस्तकाचा अनुवाद केला होता. नसिरुद्दीन शाह यांची आत्मकथा असलेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. हा गौरव म्हणजे साहित्य क्षेत्रातील योगदानाचा महत्त्वाचा टप्पा आहे.- सई परांजपे, पुरस्कार विजेत्या