साईबाबांची उपासना सर्वथा अनुचित - शंकराचार्य

By Admin | Updated: August 25, 2014 03:54 IST2014-08-25T03:54:24+5:302014-08-25T03:54:24+5:30

शिर्डीचे साईबाबा ‘अचेतन, असत्य आणि अयोग्य’ आहेत. सनातन धर्माच्या दृष्टीने त्यांची पूजा आणि उपासना करणे सर्वथा अनुचित आहे

Sai Baba's worship is completely inappropriate - Shankaracharya | साईबाबांची उपासना सर्वथा अनुचित - शंकराचार्य

साईबाबांची उपासना सर्वथा अनुचित - शंकराचार्य

जयशंकर गुप्त, कवर्धा
शिर्डीचे साईबाबा ‘अचेतन, असत्य आणि अयोग्य’ आहेत. सनातन धर्माच्या दृष्टीने त्यांची पूजा आणि उपासना करणे सर्वथा अनुचित आहे, असे ज्योतिष आणि द्वारका, शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
साईबाबांविरुद्धच्या आपल्या मोहिमेंतर्गत श्री शंकराचार्य जन कल्याण न्यासद्वारा छत्तीसगडच्या रायपूरपासून १३० कि.मी.वर असलेल्या कवर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेला संबोधित करताना स्वरूपानंद बोलत होते.
येथे जमलेले संत महात्मा आणि विचारक या मुद्यांशी संबंधित विविध पैलूंवर विचार करतील आणि निर्णय घेतील. तो जनता आणि हिंदू समाजाला मान्य असेल. साईबाबांची मूर्ती तोडणे आणि या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या हिंसेला आपले समर्थन नाही. आम्ही त्यांना अस्तित्वहीन मानतो, तेव्हा त्यांच्या मूर्ती का तोडावी, असेही ते म्हणाले. गेल्या चार महिन्यांपासून शंकराचार्य येथे आहेत. ते म्हणाले की, ते एकटे एक व्यक्ती नाही तर संस्था आहेत. आपण सनातन धर्मीय अनेक विषयांवर एकजूट होऊ शकतो. अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर निर्माण मुद्यांवर हिंदूंची एकजूट होत आहे. हिंदूंची एकजूट परदेशी लोकांना नको आहे, असेही ते म्हणाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचा कवर्धा हा गृहजिल्हा आहे. धर्मसंसदेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या पोस्टर-बॅनर्स आणि कटआऊट््स मध्ये रमणसिंग यांच्या मोठमोठ्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री स्वत: या कार्यक्रमात दिसले नाही.

Web Title: Sai Baba's worship is completely inappropriate - Shankaracharya