साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग
By Admin | Updated: November 29, 2014 02:24 IST2014-11-29T02:24:36+5:302014-11-29T02:24:36+5:30
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे.

साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग
‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी उडवली खिल्ली
पुणो : साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे. संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा शब्दांत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी संमेलनाची खिल्ली उडवली.
पुण्यात समता परिषदेतर्फे नेमाडे यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आल़े या वेळी त्यांनी विविध विषयांवर परखडपणो मते व्यक्त केली. नेमाडे यांच्या लेखनाप्रमाणोच त्यांची विधानेही नेहमीच वादग्रस्त ठरली. संमेलनासह अनेक मुद्दय़ांवर भाष्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला आह़े
संमेलनं देणग्यांवरच चालणार
संमेलनाने कुणाचेही भले झालेले नाही. संमेलनास राजकारण्यांकडून पैसा घेतला जातो, त्यामुळे अशी संमेलनं ही देणग्यांवरच चालवली जाणार आहेत. अशा संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
इंग्रजी शाळाही बंद करा
मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळवण्यास जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे केवळ पैसा मिळणार आह़े मराठीच्या जतनासाठी त्याचा विशेष उपयोग होणार नाही. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षण दिले गेले पाहिजे. मराठी ही जगातील मोठी भाषा आहे. मराठीची चिंता व्यक्त करणारे मातृभाषेचे अस्तित्व टिकण्यास कोणते प्रयत्न करीत आहेत, असा सवाल नेमाडेंनी केला.