शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

सहारिया आज निवृत्त होणार

By admin | Updated: July 31, 2014 04:38 IST

राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया गुरुवारी सेवानिवृत्त होत आहेत.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया गुरुवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) स्वाधीन क्षत्रिय यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सहारिया यांना राज्य शासनाने मुदतवाढ दिलेली नाही. या आधी जॉनी जोसेफ, प्रेमकुमार आणि जयंतकुमार बांठिया या तीनच मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळालेली होती. सहारिया यांनी आता राज्याच्या निवडणूक आयुक्त पदासाठी अर्ज केला आहे. आधीच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांचा कार्यकाळ अलीकडेच संपला.अमिताभ राजन हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात. म्हणूनच सहारियांऐवजी आपली नियुक्ती होईल, असा विश्वास त्यांना होता. तथापि, त्यांच्या पदरी निराशा आली होती. तो अन्याय या वेळी मुख्यमंत्री दूर करतील, असे म्हटले जात आहे. ज्येष्ठतेच्या निकषातही ते बसतात. ते १९७९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. क्षत्रिय हे १९८० च्या बॅचचे आहेत. अमिताभ राजन यांची वर्णी लागली तर त्यांना पाच महिने मुख्य सचिवपद मिळेल. येत्या ३१ डिसेंबर रोजी ते निवृत्त होतील. त्यांच्याऐवजी क्षत्रिय यांना संधी मिळाली तर सर्वाधिक काळ मुख्य सचिवपदी राहिलेल्यांमध्ये त्यांची गणना होईल. ते जानेवारी २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत. आता मुख्य सचिव झाले तर ते जवळपास ३० महिने मुख्य सचिव असतील. डिसेंबरमध्ये झाले तर २५ महिने मुख्य सचिव असतील. निवडणूक आयुक्तपदासाठी सहारिया यांच्याबरोबरच परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेंद्रकुमार शर्मा, माजी सनदी अधिकारी टी. सी. बेंजामिन आणि चांद गोयल हेही इच्छुक आहेत. (विशेष प्रतिनिधी)