शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

‘सागर’ वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:17 IST

उष्णतेच्या लाटेचा मात्र कहर : मान्सूनपूर्व पावसाचा धिंगाणा

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले ‘सागर’ नावाचे वादळ सोमालियाचा समुद्र पार करत, पश्चिम-दक्षिणेला सरकले आहे. परिणामी, मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाला या वादळाचा धोका नाही, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, उर्वरित राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धिंगाणा घातला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात उठलेले ‘सागर’ वादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेला सरकले. देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून हे वादळ दूर असल्याने त्याचा देशाला धोका नाही.हे वादळ पुढे सरकत आता ते सोमालियाकडे सरसावले. वादळाचा परिणाम म्हणून यमन, सोमालिया आणि सौदी अरेबियाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वादळाच्या दिशेत बदल होत असतानाच, राज्यात वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत.मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे.कोकण, गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.२० ते २३ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२० ते २१ दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.२२ ते २३ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.रविवारसह सोमवारी मुंबईमधील आकाश निरभ्र राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.राज्यात २०१ जणांना उष्माघाताचा त्रासमुंबई : आठ दिवसांपूर्वी राज्यातील उष्माघातावर उपचार घेणाºयांची संख्या १४९ असताना आरोग्यभवनाकडून नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध रुग्णालयात २०१ जण उष्माघातावर उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र अमरावती येथे उष्माघाताने एकाचा बळी गेला आहे.गेल्या वर्षी उष्माघाताने १३ जणांचा बळी गेला होता. उष्माघातावर उपचार घेणाºयांमध्ये नागपूरची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या १२९ इतकी आहे, अशी माहिती राज्य आरोग्य संचालनालयाकडून मिळाली. दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्माघाताचा प्रभाव सर्वाधिक आहे. नागपूर महापालिका क्षेत्राखालोखाल यवतमाळ क्षेत्रात २८, नागपूर जिल्हा २१, बुलढाणा क्षेत्रात १४ असे रुग्ण उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल आहेत.

टॅग्स :TemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र