देशात भगवा सूर्योदय
By Admin | Updated: May 16, 2014 10:22 IST2014-05-16T10:22:44+5:302014-05-16T10:22:44+5:30
भारतीय जनता पार्टी (भाजपा) प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळण्याचे संकेत मिळू लागले आणि देशात भगवा सुर्योदय होत असल्याची चाहुल लागली.

देशात भगवा सूर्योदय
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६- सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे भवितव्य ठरवणा-या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी सकाळी देशभरात सुरुवात झाली.
सकाळच्या पहिल्या सत्रात झालेल्या फे-यांमध्ये बहुतेक सर्व राज्यांतून भारतीय जनता पार्टी (भाजपा) प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळण्याचे संकेत मिळू लागले आणि देशात भगवा सूर्योदय होत असल्याची चाहुल लागली. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास निकालाच्या संकेतांनुसार भापजा आघाडीने लोकसभेत निम्मे बहुमत मिळवण्यासाठी आवश्यक असलेला 543 पैकी 272 जागांचा आकडा पार केला आणि प्रसारमाध्यमांतील काहींनी उत्साहाने भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विजयी घोषितही केले.
गेल्या दशकभरात सत्तेवर असलेल्या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवारांचे भवितव्य झाकोळताना दिसत होते. बागपतमधून काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंग यांना पराभूत करून भाजपाचे उमेदवार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग विजयी झाल्याचे जाहीर झाले. पूर्ण मतमोजणी होऊन जाहीर झालेला हा देशातील पहिलाच निकाल होता. त्याने एकंदर निकालांची नांदीच केली होती.