मेट्रोच्या सुरक्षेला पावणोदोन कोटी

By Admin | Updated: June 11, 2014 02:16 IST2014-06-11T02:16:15+5:302014-06-11T02:16:15+5:30

हजारो कोटी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या मेट्रोच्या सुरक्षेसाठीही मोठी रक्कम एमएमआरडीएला मोजावी लागणार आहे.

The safety of the Metro is about Rs | मेट्रोच्या सुरक्षेला पावणोदोन कोटी

मेट्रोच्या सुरक्षेला पावणोदोन कोटी

>मुंबई : मेट्रो स्थानकात प्रवेश करताच सुरक्षारक्षकांचा असलेला गराडा.. प्रत्यक्ष स्थानकात जाताना सुरक्षारक्षकांकडून केली जाणारी तपासणी.. परिसर आणि स्थानकात असलेले सीसीटीव्ही आणि जागोजागी असलेले डॉग्ज स्क्वॉड पाहता मेट्रोच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च येत असल्याचे लक्षात येईल. मोनो रेल्वे सुरू केल्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर मेट्रो रेल्वेही मुंबईकरांच्या दिमतीला आणण्यात आली. मात्र हजारो कोटी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या मेट्रोच्या सुरक्षेसाठीही मोठी रक्कम एमएमआरडीएला मोजावी लागणार आहे.
मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी असणा:या एमएमआरडीएला (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)  मेट्रो आणि  प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिन्याकाठी तब्बल 1 कोटी 7क् लाख रुपये मोजावे लागणार आहेत. मोनो रेल्वेपेक्षा मेट्रोच्या सुरक्षेचा खर्च अधिक असल्याचेही सांगितले जाते. 
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा असा 4 हजार 321 कोटी रुपयांचा मेट्रोचा टप्पा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आला. मोनो रेल्वेप्रमाणोच मेट्रोच्या सुरक्षेची जबाबदारीही एमएमआरडीएकडे आहे. एमएमआरडीएने मोनो आणि मेट्रोची सुरक्षा ही महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडे दिली आहे. मात्र मोनो रेल्वेपेक्षा मेट्रोच्या सुरक्षेचा खर्च हा अधिक असल्याचे समोर आले आहे. मेट्रोत सध्या अकरा स्थानके असून या स्थानकांवर 7क्क् पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तर 73क् सुरक्षारक्षक नेमण्यात आले असून सोबतीला प्रत्येक स्टेशनवर सहा डॉग्ज स्क्वॉड असे 72 डॉग्ज स्क्वॉड, डोअर मेटल डिटेक्टर आणि सुरक्षारक्षकांकडे हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले आहेत. या सुरक्षेचा खर्च महिन्याला 1 कोटी 7क् लाख रुपये असून एमएमआरडीए हा खर्च महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनला अदा करणार आहे. मोनो रेल्वेवर सध्या 55क् सुरक्षारक्षक असून सीसीटीव्ही 5क्क् पेक्षा अधिक आहेत. मोनो रेल्वेच्या सुरक्षेचा खर्च हा महिन्याकाठी एक कोटी रुपये येत असल्याचे  एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले. मेट्रो, मोनो आणि प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. हे पाहता हा सुरक्षेचा खर्च आम्हाला करावाच लागेल, असे कवठकर म्हणाले. मात्र मोनो रेल्वेपेक्षा मेट्रोचा खर्च अधिक असल्याचेही ते म्हणाले. यातील काही सुरक्षारक्षक हे शस्त्रधारी असल्याचे सांगितले.
 
घाटकोपर, साकीनाका, एअरपोर्ट रोड, चकाला, अंधेरी स्थानक, वर्सोवा या गर्दीच्या स्थानकांवर मोठय़ा प्रमाणात सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. 
तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना त्यानंतर सुरक्षारक्षकांच्या तपासणीतून बाहेर पडावे लागते. 
मेट्रोच्या स्थानकांबाहेरही सुरक्षारक्षक नेमण्याबरोबरच सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. 

Web Title: The safety of the Metro is about Rs