सेफ्टी डोअर, खिडक्यांच्या जाळीसाठी परवानगीची गरज नाही

By Admin | Updated: August 15, 2016 05:14 IST2016-08-15T05:14:28+5:302016-08-15T05:14:28+5:30

घरांतील अंतर्गत-रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरूपाच्या परवानग्या आॅनलाइन पद्धतीने देण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले होते.

Safety Door, Do not Need Permission For Nets | सेफ्टी डोअर, खिडक्यांच्या जाळीसाठी परवानगीची गरज नाही

सेफ्टी डोअर, खिडक्यांच्या जाळीसाठी परवानगीची गरज नाही


मुंबई : घरांतील अंतर्गत-रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरूपाच्या परवानग्या आॅनलाइन पद्धतीने देण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले होते. किरकोळ स्वरूपाच्या प्रस्तावांमध्ये जागांचे एकत्रीकरण करणे, दरवाजे काढणे, खिडक्यांचा आकार मोठा करणे, कार्यालयात केबिन तयार करणे, किचनमधील ओटयाची जागा बदलणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. या प्रकारच्या परवानगी प्रक्रियांसाठी या पूर्वी सुटसुटीत पद्धत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र, आता या सुलभीकरणाच्या प्रस्तावाला आयुक्त अजय मेहता यांनी मंजूरी दिल्याने सर्व प्रक्रिया आॅनलाइन केल्यावर संबंधितांना त्वरित परवानगी मिळणे शक्य होणार आहे.
इमारतीच्या अंतर्गत स्तरावरील ‘टेनंटेबल रिपेअर्स’ साठी परवानगीची गरज नसते. या बाबींमध्ये इमारतींच्या आरसीसी बाबींचे मजबुतीकरण करण्यासाठी गनायटींग करणे, प्लास्टरिंग करणे, रंगकाम करणे, फरशा बदलणे, संडासाचे भांडे बदलणे, विद्युत विषयक दुरुस्ती करणे आदी बाबींचा समावेश पूर्वीपासूनच आहे. यामध्ये आता महापालिकेच्या सुधारित धोरणानुसार ‘उघडता येईल असा घराचा सुरक्षा दरवाजा’ (सेफ्टी डोअर) आणि ‘खिडक्यांच्या जाळी’ (ग्रील) यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता घराला सेफ्टी डोअर बसविणे, खिडक्यांना जाळी बसविणे या बाबींसाठी महापालिकेची परवानगी घेण्याची गरज असणार नाही.
तथापि, खिडक्यांना बसविण्याची जाळी ही आवश्यकतेनुसार सहजपणे उघडता येईल, अशा प्रकारची असणे बंधनकारक असणार आहे. (प्रतिनिधी)
>भिंत हटविणे, अंतर्गत दरवाजे काढणे, खिडकीचा आकार मोठा करणे इत्यादी कामे करताना घर/सदनिका, दुकान, कार्यालये, औद्यागिक जागा इत्यादींबाबत इमारतीच्या मूळ बांधकामाला धक्का लागणार नाही; याची संबंधितांनी बांधकामावेळी खबरदारी घ्यावी.
किचनमधील ओट्याची जागा बदलणे किंवा त्याची उंची कमी जास्त करणे. मात्र, हे करताना सांडपाणी व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
सांडपाणी व मलनि:सारण व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची काळजी घेत बाथरूम, टॉयलेट ब्लॉकमध्ये बदल करावा.
>अंतर्गत रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरूपाच्या प्रस्तावांबाबत आॅनलाइन प्रस्ताव सादर करताना त्यासोबत अर्जदाराचे घोषणापत्र असणे आवश्यक असणार आहे.
ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. इमारत पूर्णत्त्वाचा दाखला देण्यात आलेला आहे, अशा इमारतींमध्ये परवानग्या आॅनलाइन देण्याचे प्रस्तावित आहे.

Web Title: Safety Door, Do not Need Permission For Nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.