साईदरबारीही ‘टाइम दर्शन’
By Admin | Updated: September 15, 2015 01:02 IST2015-09-15T01:02:09+5:302015-09-15T01:02:09+5:30
तासन्तास रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्याकरिता साईसंस्थान तिरुपतीच्या धर्तीवर टाइम दर्शन सुरू करणार असल्याची माहिती साईसंस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य

साईदरबारीही ‘टाइम दर्शन’
शिर्डी : तासन्तास रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्याकरिता साईसंस्थान तिरुपतीच्या धर्तीवर टाइम दर्शन सुरू करणार असल्याची माहिती साईसंस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़
तिरुपती देवस्थान व वैष्णोदेवी देवस्थानांना ज्या एजन्सी मार्फत टाइम दर्शन सुविधा पुरवण्यात येते़ त्या एजन्सीने येथेही ही सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे़
संस्थान या एजन्सीला येथे केवळ जागा व संगणक उपलब्ध करून देणार आहे़ याशिवाय संस्थानला यासाठी वेगळी कोणतीही गुंतवणूक किंवा खर्च करावा लागणार नाही़ भाविकांनी दर्शनासाठी नोंदणी केल्यानंतर त्याला विशिष्ट वेळेचा उल्लेख असलेले तिकीट देण्यात येईल. (प्रतिनिधी)