साधुग्राम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर!

By Admin | Updated: July 7, 2015 01:41 IST2015-07-07T01:41:08+5:302015-07-07T01:41:08+5:30

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात घातपात होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच साधूंचे महत्त्वाचे आखाडेही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़

Sadhugram attacked the terrorists! | साधुग्राम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर!

साधुग्राम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर!

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात घातपात होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच साधूंचे महत्त्वाचे आखाडेही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर तपोवनातील दिगंबर आखाड्याची मुंबईच्या ‘फोर्स वन’ या कमांडो पथकाने रेकी केली़ दहशतवाद्यांचे टार्गेट आता नाशिकही असल्याने साधू-महंत धास्तावले आहेत.
तपोवनात दिगंबर आखाड्याचे देशातील मुख्य स्थान आहे. या आखाड्याची नाशिकमधील सूत्रे सध्या महंत रामकिशोरदास महाराज यांच्याकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील फोर्स वन कमांडो पथकाच्या अधिकाऱ्यांनी रामकिशोरदास यांची भेट घेतली व त्यांना आखाड्याची रेकी करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी साध्या वेशातील एक अधिकारी व चार कमांडोंनी आखाड्याची रेकी केली. आखाड्याचे एकूण क्षेत्रफळ, त्यातील बांधकाम, रचना, सर्व खोल्या, पाण्याच्या टाक्या या सर्व बाबींची मापे घेण्यात आली. आखाड्याच्या इमारतीच्या अगदी बारीकसारीक भागांचीही छायाचित्रे घेण्यात आली. सुमारे तासभर झालेल्या या पाहणीवेळी महंत रामकिशोरदास उपस्थित नव्हते. आखाड्यात आल्यानंतर अन्य साधूंनी त्यांना ही माहिती दिली. त्यांनी ही बाब सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र त्यांनाही याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे रेकी करणारे खरोखर फोर्स वनचे अधिकारी होते की बनावट, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. नंतर तो वाद मिटला.

Web Title: Sadhugram attacked the terrorists!