साधना पोलीस आयुक्तालयात
By Admin | Updated: April 8, 2015 02:19 IST2015-04-08T02:19:50+5:302015-04-08T02:19:50+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांनी आज गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी भेट घेऊन बिल्डर युसूफ लकडावालासोबत सुरू असलेल्या

साधना पोलीस आयुक्तालयात
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांनी आज गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी भेट घेऊन बिल्डर युसूफ लकडावालासोबत सुरू असलेल्या वादात सहकार्य करण्याची व संरक्षण पुरविण्याची मागणी केली. यावेळी भाजप नेत्या शायना एनसी त्यांच्यासोबत होत्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सांताक्रुजमधील संगीता बंगल्यात साधना राहतात.
या बंगल्याच्या विकासावरून गेली काही वर्षे साधना व लकडावाला यांच्यात वाद सुरू आहे. दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत.