जमिनीच्या कुशीत रामनरेशदास महाराजांची साधना
By Admin | Updated: August 23, 2015 00:08 IST2015-08-23T00:08:03+5:302015-08-23T00:08:03+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम परिसरात एकापेक्षा एक सरस योगी, साधूंची आश्चर्यकारक साधनेची लीला बघावयास मिळत आहे. जमिनीत ११ फूट खड्डा करून त्यामध्ये किमान महिनाभर

जमिनीच्या कुशीत रामनरेशदास महाराजांची साधना
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम परिसरात एकापेक्षा एक सरस योगी, साधूंची आश्चर्यकारक साधनेची लीला बघावयास मिळत आहे. जमिनीत ११ फूट खड्डा करून त्यामध्ये किमान महिनाभर रामनरेशदास महाराज तपश्चर्येत मग्न राहणार आहे.
शुक्रवारपासून त्यांची साधना सुरू झाली आहे. तपोभूमीत प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात वास्तव्य केल्याने तपोवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तपोवनात फेरफटका मारताना एखादे साधू महाराज झाडाला टांगलेल्या झोक्याच्या आधाराने एका पायावर उभे राहिल्याचे दिसतात, तर कोणी जमिनीपासून उंच मचाणावर बसलेले तर कोणी वर्षानुवर्षांपासून उभेच असल्याचे चित्र दिसते. त्यापैकीच एक नरेंद्रदास महाराज. त्यांचे नुकतेच गुजरातहून तपोभूमीत आगमन झाले आहे.त्यांनी शुक्रवारपासून जमिनीच्या कुशीत तपश्चर्येला सुरुवात केली आहे. त्यांची ही अनोखी साधना बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी तपोवनातील राजेंद्र मळा परिसरात भाविकांची रीघ लागली आहे.
श्री १००८ संत शिरोमणी तपस्वी श्री नारायणदास महाराज यांचे शिष्य तपस्वी लक्ष्मीदास महाराजांचे रामनरेशदास महाराज शिष्य आहे. ज्याप्रमाणे सीतामातेने जमिनीच्या कुशीत समाधी घेतली होती.
नाशिकमध्ये चतु:संप्रदायच्या ध्वजावरून मतभेद
चतु:संप्रदाय खालशाच्या ध्वजारोहणापूर्वी इष्टदेवतेच्या मंदिरासमोर पंचरंगी दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज फडकविण्याची मागणी काही साधू महंतांनी केल्याने वादविवाद होऊन विलंबाने ध्वजारोहण झाले.
चतु:संप्रदाय आखाड्याची ध्वज इष्टदेवता हनुमाचे प्रतीक असते. त्यामुळे कुंभमेळ्यात चतु:संप्रदाय खालशाची ध्वजा लाल रंगाची असते, असा दावा चतु:संप्रदाय आखाड्यातील साधू-महंतांकडून करण्यात आला. चतु:संप्रदाय खालशाचे ध्वजारोहण अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास व खालशाचे महंत ब्रह्मऋषी बर्फानी दादाजी, महंत फुलडोलदास बिहारी, महंत रामलखनदास, महंत रासबिहारीदास यांच्या हस्ते झाले.
चतु:संप्रदाय खालशात पंचरंगी धर्मध्वज खालशाच्या ध्वजारोहणापूर्वी फडकायला हवा, असा विचार साधू-महंतांकडून व्यक्त करण्यात आला होता. खालशाची ध्वजा लाल असून, त्याला सोनेरी किनार असते. खालशामध्ये धर्मध्वजा लाल रंगाची फडकविण्याची परंपरा आहे. पंचरंगी ध्वजा फडकविली जात नाही. सूचना करीत आहेत, त्यांनी पूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घ्यावा, असे महंत फुलडोलदास बिहारी यांनी सांगितले.