साहित्य संमेलनाध्यक्षपदी सदानंद मोरे
By Admin | Updated: December 11, 2014 02:36 IST2014-12-11T02:36:24+5:302014-12-11T02:36:24+5:30
पंजाबमधील घुमान येथे एप्रिलमध्ये होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.

साहित्य संमेलनाध्यक्षपदी सदानंद मोरे
पुणो : पंजाबमधील घुमान येथे एप्रिलमध्ये होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. बुधवारी मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच एकल पद्धतीने 498 मते मिळवित डॉ. मोरे यांनी मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार भारत सासणो यांचा पराभव केला. (प्रतिनिधी)
मिळालेली मते
डॉ. सदानंद मोरे : 498
भारत सासणो : 427
डॉ. अशोक कामत :65
डॉ. पुरुषोत्तम नागपुरे : 02
50 वर्षाच्या इतिहासात प्रथमच 1,क्19 इतके विक्रमी मतदान झाले.
बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न
साहित्य संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला बिनविरोध मिळावे हे मला तत्त्वत: मान्य आहे. या पदाचा मान राखलाच गेला पाहिजे. आगामी काळात संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करेन. - डॉ. सदानंद मोरे
निवडून येण्यास मतांचा आवश्यक कोटा 497 होता. डॉ. मोरे यांना 498 मते मिळाले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून अॅड. प्रमोद आडकर आणि पुणो विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रमोद भडकवडे यांनी काम पाहिले. -आणखी वृत्त/1क्