शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब; सदानंद मोरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:52 IST

Marathi Language News: अखेरीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय जारी झाला आहे.

Marathi Language News: अखेरीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय जारी झाला आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयाचा शासन आदेश तीन महिने लोटले तरी निघाला नसल्याने निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हा शासन आदेश स्वीकारला. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतपणे अभिजात भाषा ठरली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले. 

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी दिली प्रतिक्रिया

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा शासन निर्णय आल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी कार्य करत आहे. गर्जा महाराष्ट्र ही लेखमाला लिहिली. या भाषेला २ ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. महाराष्ट्र प्राकृतचा प्रभाव संस्कृत साहित्यावर पडला आहे. महाराष्ट्र प्राकृत आणि मराठी भाषा यासाठी कार्य करणे आता शक्य होणार आहे. मराठी भाषेची आधीची आवृत्ती आहे, ज्याला प्राकृत म्हटले जाते, तिलाही आभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही समाधानाची बाब आहे, असे सदानंद मोरे म्हणालेत.

दरम्यान, मराठी भाषेतील काम साहित्यिकांना विश्वासात घेऊन केले जाईल. साहित्य संमेलनाला २ कोटींचा निधी देण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीही तो निधी देण्यात येईल. दिल्ली आणि अन्य भागात मराठी शाळा आहेत. त्या शाळा सुदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणार आहोत. योगायोग म्हणजे ११ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव पाठवण्यात आला, त्यावेळी मी राज्यातील मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री होतो. तर आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आणण्याचे भाग्य नियतीने लिहून ठेवलेले होते. म्हणून आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, असे मला वाटते, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :marathiमराठीSadanand Moreसदानंद मोरेUday Samantउदय सामंत