...तर अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ; सचिन सावतांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 11:05 AM2020-03-02T11:05:12+5:302020-03-02T11:06:26+5:30

बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला होता.

Sachin Sawant criticized Sharad Ponkshane | ...तर अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ; सचिन सावतांची खोचक टीका

...तर अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ; सचिन सावतांची खोचक टीका

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी हे विधान केलं होतं. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत पोंक्षे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सावंत म्हणाले की, "अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असे म्हणणे म्हणजे, अभिनयाच्या क्षेत्रात हॉलिवूडच्या बेन किंग्जले, अल पचिनो आणि बॉलिवूडच्या दिलीप कुमार व अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा शरद पोंक्षे यांचे योगदान श्रेष्ठ म्हणण्यासारखं आहे.

अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर कांकणभर श्रेष्ठ असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला होता.

Web Title: Sachin Sawant criticized Sharad Ponkshane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.