११ दिवसांत सार्इंना १२ कोटींचे दान
By Admin | Updated: January 5, 2016 03:22 IST2016-01-05T03:22:41+5:302016-01-05T03:22:41+5:30
नाताळ व नववर्षानिमित्त साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या अकरा दिवसांत साईचरणी तब्बल ११ कोटी ८७ लाख रुपये अर्पण केले़ गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम एक कोटीने अधिक आहे़

११ दिवसांत सार्इंना १२ कोटींचे दान
शिर्डी : नाताळ व नववर्षानिमित्त साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या अकरा दिवसांत साईचरणी तब्बल ११ कोटी ८७ लाख रुपये अर्पण केले़ गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम एक कोटीने अधिक आहे़
नाताळच्या सुट्टीमुळे २४ डिसेंबरपासून शिर्डीत भाविकांचा ओघ होता़ तसेच दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह लाखो भाविकांनी नववर्षाचा श्रीगणेशाही साईदर्शनाने केला. २४ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यानच्या काळात भाविकांनी सार्इंना देणगी स्वरूपात ११ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले़ या दानात मंदिरातील हुंडीमध्ये ८ कोटी १० लाख २८ हजार रुपये, देणगी काऊंटरवर ३ कोटी २४ लाख ६२ हजार, आॅनलाइन देणगी १९ लाख ६९ हजार रुपये, असे ११ कोटी ५४ लाख ५९ हजार रुपये रोख, तर २७ लाख रुपये किमतीचे १ किलो २१३ ग्रॅम सोने व ५ लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या २१ किलो चांदीचा समावेश आहे़ या देणगीत विदेशी चलन, धनादेश आदींचा समावेश नाही़
संस्थानाकडे सध्या ३८६ किलो सोने व ४१२७ किलो चांदी आहे़ विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १५३५ कोटींच्या ठेवी आहेत़ भाविकांच्या देणगीतून संस्थान नाममात्र दरात दर्जेदार भोजन व निवास व्यवस्था उपलब्ध करून देत असते़ याशिवाय चालवण्यासाठी दोन रुग्णालयेही चालवली जातात़