शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

"निवडणुकांत महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करण्याचं विशाल मन विरोधी पक्षाकडे उरलंय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 07:49 IST

शिवसेनेचा सवाल. जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, शिवसेनेचं वक्तव्य

ठळक मुद्देशिवसेनेचा सवाल. जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, शिवसेनेचं वक्तव्य

जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपला पुढे जाता आले नाही. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा शाधला.

महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?, असा सवालही शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत. 

... ते सरशीवाल्यांनी सांगावंओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपास 33 जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने 73 पेक्षा 33 आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे. 

जिल्हा परिषद निवडणुकांतही महाविकास आघाडीस 46 तर भाजपला 22 जागा मिळाल्या. आता 46 हा आकडा भाजपच्या 22 पेक्षा दुप्पट असे कोणताही ‘गणिती’ सांगेल. इतिहासाचे धडे बदलले जात आहेत तसे बीजगणित, भूमितीची प्रमेयेसुद्धा बदलली जात आहेत काय? या काही सरसकट निवडणुका नव्हत्या हे समजून घेतले पाहिजे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुकांना सामोरे जावे लागले. 

मजबूत विरोधीपक्ष म्हणून ताकद दाखवलीभारतीय जनता पक्षाचे म्हणणे असे की, त्यांचा पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. ते खरेच आहे. भाजपने 22 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला संकोच वाटू नये. महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली ताकद दाखवली आहे. भाजपने 22 जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे 105 आमदार निवडून आले, पण 105 आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही. 

देशातले वातावरण भाजपविरोधी देशातले वातावरण भाजपविरोधी झाले आहे. उत्तर प्रदेशातील मंत्रीपुत्राने ज्या निर्घृणपणे शेतकऱयांना चिरडून मारले, त्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. महाराष्ट्रातला शेतकरीही चिंतेत आहे. निसर्गाचा तडाखा आहेच, पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारनेही हात आखडता घेतल्याने शेतकऱयांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या सगळय़ांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करीत आहे. भाजपची धोरणे सरळ सरळ शेतकरीविरोधी आहेत. भाजप शेतकऱयांशी सूडाने वागत आहे. हा सूड शेतकऱयांचे मुडदे पाडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला हे काही माणुसकीचे लक्षण नाही. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीZP Electionजिल्हा परिषदBJPभाजपा