रशियन महिला गोव्याच्या प्रेमात !
By Admin | Updated: July 10, 2014 01:21 IST2014-07-10T01:21:22+5:302014-07-10T01:21:22+5:30
पर्यटकांचे ‘इंटरनॅशनल फेव्हरिट डेस्टिनेशन’ असलेल्या गोव्याने सर्वाधिक भूरळ रशियन पर्यटकांना घातली आहे.

रशियन महिला गोव्याच्या प्रेमात !
सुशांत कुंकळयेकर - पणजी
पर्यटकांचे ‘इंटरनॅशनल फेव्हरिट डेस्टिनेशन’ असलेल्या गोव्याने सर्वाधिक भूरळ रशियन पर्यटकांना घातली आहे. गोव्याच्या ‘सन, सँड व सर्फ’ याबरोबरच योगा तसेच आयुर्वेदिक उपचारांसाठी रशियन महिला गोव्यात अधिक येतात, असे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे.
रशियन माहिती केंद्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात यंदा दोन लाख रशियन पर्यटकांनी येण्याचे निश्चित केले आहे. मागील वर्षी ही संख्या 1 लाख 62 हजार होती. कझाकिस्तान, युक्रेन आणि रशियातील पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली आहे. समुद्रकिना:यांवर दिवसभर सनबाथ घेण्याबरोबच रात्रीच्या पाटर्य़ा आणि अँटिक शॉपिंगसाठी पर्यटक गोव्यात येतात. गोवा रशियन लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. महत्त्वाचे म्हणजे रशियन लोकांसाठी तुलनेने हे सर्वात स्वस्त पर्यटन केंद्र आहे, असे ‘तारा’ या रशियन पर्यटक केंद्राच्या संचालिका एकातारिना बेलियाकोव्हा यांनी सांगितले. यंदा पर्यटनाच्या हंगामात साधारणपणो 1क् दिवसांमध्ये कझाकिस्तानातून एक तर रशियातून दोन अतिरिक्त चार्टर विमाने येतील, अशी अपेक्षा आहे. पर्यटकांची दक्षिणपेक्षा उत्तर गोव्याला अधिक पसंती आहे. रशियन पुरुष व महिला गोव्यात येण्याचे प्रमाण 4क् - 6क् असे आहे.
गोवा पर्यटन खात्याने विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजिलेल्या ट्रॅव्हल ट्रेड प्रदर्शनात भाग घेतला.
तेथे गोव्याचे ब्रँडिंग चांगल्याप्रकारे केले. त्यामुळेच गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या वेगाने वाढली, असे गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर म्हणतात.
विक्रमी विदेशी पर्यटक
च्2013- 14 या पर्यटन हंगामात गोव्यात तब्बल 2 लाख 61 हजार विदेशी पर्यटक आले. ऑक्टोबर 2013 ते एप्रिल 2014 दरम्यान आलेल्या पर्यटकांची आतार्पयतची ही विक्रमी संख्या आहे. मागच्या वर्षी गोव्यात 2 लाख 15 हजार विदेशी पर्यटक आले होते.
च्2012- 13 च्या पर्यटन हंगामात गोव्यात विदेशी पर्यटकांना घेऊन 996 चार्टर विमाने आली होती. यंदा त्यात 13 टक्क्यांची भर पडत चार्टर विमानांची संख्या 1,128 झाली. रशियनांपाठोपाठ गोव्यात येणा:यांमध्ये ब्रिटिश पर्यटकांची संख्या अधिक आहे.
व्हिसा ऑन अरायव्हलची गरज : गोव्यात रशियन लोकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ ही सुविधा सुरू झाल्यास पर्यटक येण्याचे प्रमाण अधिक वाढेल, अशी अपेक्षा पर्यटन कंपन्यांनी केली आहे. सध्या अशी सुविधा थायलंडला उपलब्ध आहे. त्यामुळे रशियनांची पावले थायलंडला वळू लागली आहेत.