ग्रामीण जनतेचे औषधोपचार महागणार

By Admin | Updated: March 2, 2015 02:08 IST2015-03-02T02:08:35+5:302015-03-02T02:08:35+5:30

जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी भागातील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य

The rural people will get the medicines expensive | ग्रामीण जनतेचे औषधोपचार महागणार

ग्रामीण जनतेचे औषधोपचार महागणार

सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी भागातील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंदे्र (पीएचसी) आहेत. मात्र या केंद्रांतील औषधोपचार आता महाग होण्याची चिन्हे आहेत. पाच रुपयांत मिळणाऱ्या केसपेपरसाठी रुग्णाला सुमारे १० रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सुमारे ७८ पीएचसी आहेत. यापैकी सध्या ठाणे जि.प.कडे ३३ पीएचसीसह १८५ उपकेंदे्र आहेत. पालघर जि.प.च्या नियंत्रणात ४६ पीएचसी असून, दुर्गम भागांत उपकेंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये दिवसभरात सुमारे साडेचार हजार रुग्णांवर औषधोपचार केला जात आहे. यामध्ये या दोन्ही जिल्ह्यांतील ९३२ ग्रामपंचायतींच्या सुमारे १७४२ गावपाड्यांमधील ग्रामस्थांमधील रुग्णांचा समावेश आहे.
यासाठी सुमारे पाच रुपये केसपेपरसाठी मोजावे लागत असताना आता त्यासाठी १० रुपये द्यावे लागणार आहेत. या
आशयाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे यांनी दुजोरा दिला. यामुळे ग्रामस्थांचे औषधोपचार लवकरच महागणार असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: The rural people will get the medicines expensive