शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

"दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या...", रुपाली चाकणकरांची जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:49 IST

महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

मुंबई : अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन २२ जानेवारीला करण्यात आले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्यात राम मांसाहारी होता, असे वक्तव्य केले. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या वक्तव्यवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

भाजपा, शिवसेना शिंदे गटाकडून याचा प्रखर विरोध करण्यात आला आहे, तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही काहींनी मागणी केली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही यावर भाष्य केले आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत रुपाली चाकणकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

"साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डी मधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात. त्या ठिकाणी दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे. मागे पोपटपंची करताना हेच महाशय म्हणाले होते "हे वर्ष दंगलींचं वर्ष असेल." त्या वाक्याला खरं करण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना? महाराष्ट्र शांत आहे, शांतच राहू द्या", असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याचबरोबर, "लोकांना प्रभू श्रीरामबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मुद्दाम बोलून लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण बंद करा. उद्या महाराष्ट्रात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन या महाशयांवर कठोर कारवाई करावी", अशीही मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. दरम्यान, भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार राम शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.

वादानंतर आव्हाडांचं स्पष्टीकरणप्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRupali Chakankarरुपाली चाकणकर