शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

"अजितदादांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास"; दमानियांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे भावनिक प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:48 IST

अजित पवार यांना अर्थकारण खरंच कळतं का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता.

Rupali Chakankar vs Anjali Damania: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणावरुन सध्या जोरदार वाद सुरु झालाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवरून बोचरी टीका केली. अजित पवार दहावी पास असून त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? असा सवाल अंजली दमानियांनी केला होता. दमानियांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इंजिनियरला लाजवेल असा अजित पवार यांचा अभ्यास आहे, असं म्हटलं.

अंजली दमानिया रविवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली. महाराष्ट्रावर असलेल्या कर्जाच्या मुद्द्यावरुन अंजली दमानिया माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास आहेत असं म्हटलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून त्यांनी दमानिया यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत आहे. रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करत अजित पवार यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचे कारण सांगितले. 

"आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच," असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.

अजित पवारांनी कृषी मंत्री व्हावे; दमानियांचा पुन्हा पलटवार

रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर अंजली दमानिया यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. "मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे.   स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत ८ पट मोठे आहे. स्वित्झर्लंड ची GDP ८३,३३,००० कोटी आहे  आणि महाराष्ट्राची ४२,६७,००० कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता ९,३२,००० कोटी आहे. ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का?," असा सवाल दमानियांनी केला.

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?

"महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे दहावी पास आहेत. त्यांच्या शिक्षणावर मला टीका करायची नाही. पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का यासाठी मी हे उदाहरण दिलं. महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे. पण तो एक देश आहे आणि आपला महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. हे पैसे कुठूण आणणार यावर कुणीही चर्चा करत नाही. क्षुल्लक गोष्टींचं राजकारण कायमच केलं जातं पण हा प्रश्नही महत्त्वाचा आहे," असं दमानियांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Knowledge Surpasses Engineers: Chakankar Responds to Damania's Criticism

Web Summary : Anjali Damania questioned Ajit Pawar's education, leading to a dispute. Rupali Chakankar defended Pawar, highlighting his sharp intellect despite incomplete formal education. Damania retorted, suggesting Pawar become Agriculture Minister, emphasizing the need for economic expertise in finance.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRupali Chakankarरुपाली चाकणकरanjali damaniaअंजली दमानिया