'व्हॉटस अॅप'वरून पसरवली प्राध्यापकाच्या मृत्यूची अफवा
By Admin | Updated: May 5, 2014 14:13 IST2014-05-05T00:18:23+5:302014-05-05T14:13:14+5:30
प्राध्यापकाचा मृत्यू झाल्याची अफवा व्हॉट्स अॅपद्वारे पसरविल्याने शहरात खळबळ उडाली. राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत शारदानगर येथे रविवारी दुपारी १ वाजता ही घटना उघडकीस आली.

'व्हॉटस अॅप'वरून पसरवली प्राध्यापकाच्या मृत्यूची अफवा
अमरावती : प्राध्यापकाचा मृत्यू झाल्याची अफवा व्हॉट्स अॅपद्वारे पसरविल्याने शहरात खळबळ उडाली. राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत शारदानगर येथे रविवारी दुपारी १ वाजता ही घटना उघडकीस आली. दीपक नथमल सोनी (५०,रा. शारदानगर) या प्राध्यापकाचा मृत्यू झाल्याची बातमी अज्ञात व्यक्तीने व्हॉट्स अॅपवरून पसरवली. दीपक सोनी हे ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते शारदानगर येथे शिकवणी वर्ग घेत आहेत. ते जीवंत असताना भ्रमणध्वनीवरून अज्ञात व्यक्तीने गुरुवारी दीपक सोनी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अफवा व्हॉट्स अॅपवर पसरवली. हा संदेश सर्वत्र पोहचताच एकच खळबळ उडाली. सोनी यांच्याकडील दूरध्वनीवर अनेकांचे फोन खणखणले. दीपक सोनी यांना यामुळे मन:स्ताप सहन करावा लागला. हा प्रकार दीपक सोनी यांचे भाऊ अनिल सोनी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची तक्रार रविवारी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.