सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग
By Admin | Updated: August 11, 2014 22:58 IST2014-08-11T22:58:15+5:302014-08-11T22:58:15+5:30
व्हॉटसअँपवर अलिताही वाढली : सर्वसामान्यांची डोकेदुखी

सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग
बुलडाणा: परस्परांशी अगदी सहज अँक्सेस होणार्या व्हॉटसअपने सद्यस्थितीत तरूणाईला भुरळ घातली आहे. मात्र, एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा यावर अफवांच्या शेअरिंगलाच कमालीचा उत आला आहे. परिणामी डोकेदुखी वाढली आहे. सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. फेसबुकची क्रेझ काहीशी कमी होते ना होते तोच व्हॉटसअँपने तरूणाईला कवेत घैतले आहे. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदा होत असला तरी, सद्या वाट चुकललेल्या काही वापरकर्त्यांंंनी या जादुच्या कांडीचा वापर चुकींच्या कामांसाठी चालविला आहे. योग्य प्रसंगावधान साधुन एखादी अफवा व्हॉटस्अप वर शेअर केली जाते.
** शिक्षकाची मारहाण
एक शिक्षक विद्यार्थ्यांंंना गुरा सारखा बदडत असल्याचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासुन व्हॉटस्अँपवर फॉर्वड होत आहे. हा व्हिडीओ पाहताच कुणाचाही पारा चढणे सहाजीकच आहे इतका क्रुर आहे. हा व्हिडीओ पाहणार्या प्रत्येकाने हा कुठला आहे, तो शिक्षक कोण याची विचारणा ग्रुपवर व मित्रांमध्ये करणे सुरू केले. कुणालाही हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती नव्हती, नंतर बुलडाण्यातील एका पत्रकाराने सायबर सेलला याबाबत माहिती दिली असता तो व्हिडीओ खूप जुना असल्याची बाब समोर आली. वास्तविक तो व्हिडीओ हा अतिशय संतापजनक असाच आहे. कुठल्याही सहदय व्यक्तीला अस्वस्थ करणारे ते चित्रीकरण आहे अनेकांनी याबाबत विचारणा केली मात्र कुठलीही खातरजमा न करता सदर व्हिडीओ फॉरवर्ड होत गेला हे समोर आले.
** मृत्यू व आजारांच्या अफवा
सिने अभिनेत्री माधुर दिक्षीत यांच्या वाहनाला मुंबई- पूणे मार्गावर अपघात झाला असुन या अपघातामध्ये त्यांची प्राणज्योत मालविली असल्याची धक्कादायक बातमी व्हॉटस्अँपनेच सर्वत्र पसरविली होती. सोबतच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भन्ते सुरई ससाई, लता मंगेशकर, यांच्याही आजाराबाबत व्हॉटस् अँप वर अफवा पसरल्या होत्या. या अफवांचे शेअरींग करताना कुणीही सत्यता पडताळत नाही त्यामुळे सर्व सामान्य नागरीक चांगलेच धास्तावले जातात. नंतर मात्र अशी कुठलीच बातमी नसल्याचे पाहून अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकतात खरा मात्र त्यांची दिवसभर त्रेधातिरपीट उडालेली असते. अशा अफवांची आधी खातरजमा करून घ्या नंतरच शेअरींगचा निर्णय घेतला पाहिजे अन्यथा हे प्रकार थांबविले पाहिजे.
** चिखली मार्गावर अपघात
मागील महिन्यात पुणे येथे दोन विद्यार्थिनींचा अपघात झाला होता. त्या अपघात दोन्ही विद्यार्थिनींचा जागेवरच मृत्यू झाला होता. याबाबतच्या फोटोवरून अपघाताची भिषणता दिसून येत होती. या अपघाताचे वृत्त विविध वाहिन्यावर झळकले होते. दरम्यान अपघाताच्या तिसर्या दिवशी तीच पोस्ट टाकताना .पुणे शहराचा उल्लेख केला नाही. सर्व गृपमध्ये चिखली रस्त्यावर भिषण अपघात, दोन विद्यार्थिंंंनी जागीच ठार झाल्याचे वृत्त पोस्ट केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. व्हॉटस् अँपवर ही बातमी फिरल्यावर अनेक पत्रकारांनी चिखली रस्त्यावर धाव घेतली. पोलीस स्टेशनचे दूरध्वनी खणखणले. नागरीकही विचारणा करू लागले मात्र शेवटी विद्यार्थिनींच्या अपघाताचे वृत्त अफवा ठरले.
** सावधनता बाळगणे गरजेचे
फेसबुक चा वापर करताना युर्जसने दक्षता घेणे गरजेचे आहे. फेसबुक वापरताना कुणालाच आपला पासवर्ड तथा अन्य खासगी माहीती देऊ नये. एवढेच नव्हेतर पासवर्ड हा अत्यंत क्लिष्ट ठेवावा जेणेकरून सहज कुणालाही तुमचे अकाऊंट वापरणे शक्य होणार नाही. व्हॉटस्अप वापरताना आपल्याला आलेला प्रत्येक संदेश दुसर्यांना पोस्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. कुणी अफवा पसरवित असेल तर त्याला दाद देऊ नका म्हणजे या कृत्याला पायबद घातल्या जाईल.
** पालकांनो तुम्ही जागृत व्हा !
व्हॉटस्अँप व फेसबुक या सोशल मिडीयातील अप्लिकेशनचा वापर मुलेच करतात असे नाही. मुलीही ही अप्लिकेशन हाताळत आहेत. त्यांचेही ग्रुप आहेत; पण या ग्रुपमध्ये नेमक ी कशाची देवाण-घेवाण केली जाते हे पाहिले असता त्याही मुलांपेक्षा वेगळे काही करीत नाहीत हेच दिसून आले त्यामुळे आता पालकांनी जागृत होण्याची वेळ आली आहे. आपला मुलगा अथवा मुलगी हातातील मोबाईल सोडतच नसेल तर पालकांनी त्यांची चौकशी करावी तसच याला आळा बसेल. अन्यथा..