किरकोळ कारणावरून रुममेटचा खून

By Admin | Updated: July 4, 2016 10:56 IST2016-07-04T10:55:38+5:302016-07-04T10:56:03+5:30

जेवताना झालेल्या वादामधून तरुणाचा डोक्यात जेवणाचा डबा घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पुण्यात घडली.

Rumamet's blood on retail grounds | किरकोळ कारणावरून रुममेटचा खून

किरकोळ कारणावरून रुममेटचा खून

>पुणे : जेवताना झालेल्या वादामधून तरुणाचा डोक्यात जेवणाचा डबा घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री वारज्यात घडली. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुधीर विलास जाधव (वय 27, रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन पाटील आणि वतने यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वतने याला ताब्यात घेण्यात आले आहे. जाधव, पाटील आणि वतने हे हिंगणे होम कॉलनीमध्ये एका खोलीत एकत्र राहण्यास आहेत. सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास तिघे एकञ जेवण करत होते. त्यावेळी झालेल्या वादामधून आरोपींनी जाधवच्या डोक्यात जेवणाचा डबा मारून जखमी केले. शेजाऱ्यानी जाधवला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना सव्वा दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Rumamet's blood on retail grounds