शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले- हेमंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:09 IST

२९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावर आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जातीचे दाखले मिळू नयेत म्हणून झुलवत ठेवल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावरही आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.ते म्हणाले, धनगर आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने आपली वोटबँक भरून सत्तेचा उपभोग घेतला. धनगर समाजाला कुठलाही पक्ष नको असून, एसटीमध्ये जातीचे दाखले हवे आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात धनगर बांधव रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहे. तरीही भाजपा सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने टिसचा अहवाल मागवून घेतला नाही, म्हणूनच धनगर समाजाला २९ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर ‘भाजपा सरकार चले जाव’ असा आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. या मोर्चात एक ते दीड लाख धनगर समाज उपस्थित राहण्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.मोर्चादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. काही भाजपाची नेते मंडळी धनगर आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगळ्या मोर्चाची चूल मांडून शक्तिप्रदर्शन करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. या वेळी जनहित संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सायली शिंदे, विक्रम भोसले, राजेश पालवे, समाधान बचिरे हे समन्वयक उपस्थित होते.२७ आॅगस्टला बैठक मुंबई : धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध संघटनांची बैठक २७ आॅगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली आहे.सध्या धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठीचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले आहे.टीसीएसचे अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत हा अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :reservationआरक्षण