शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

‘एक्सप्रेस वे’वर नियमांना हरताळ

By admin | Published: April 21, 2016 1:00 AM

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनचालकांकडून पदोपदी वाहतूक नियम व लेनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहणीत आढळून आले

विशाल विकारी,  लोणावळामुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनचालकांकडून पदोपदी वाहतूक नियम व लेनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहणीत आढळून आले. महामार्ग पोलिसांनी एक्सप्रेस हायवेवर १५ एप्रिलपासून लेन कटिंग करणाऱ्या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. पाच दिवसांत या मार्गावर ७५ हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. मात्र, पदोपदी वाहनचालक लेनच्या नियमांचा भंग करीत सर्रास पहिल्या व दुसऱ्या लेनमधून वाहने भरधावपणे दामटत असल्याचे दिसून आले. नियम मोडणाऱ्यांमध्ये एसटी महामंडळ व खासगी प्रवासी बसचे प्रमाण सर्वाधिक आढळले. यासह मल्टिअ‍ॅक्सल कंटेनर, मालवाहू ट्रक हे देखील सर्रास मधल्या लेनमधून प्रवास करताना आढळले. महामार्गावर जागोजागी लेनचे नियम सांगणारे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणारे चालक या नियमांकडे सर्रास काणाडोळा करीत आहेत. महामार्ग पोलिसांच्या सहा तुकड्या या कारवाई मोहिमेत सक्रिय आहेत. मात्र ९४ किमी अंतराच्या या मार्गावर व लेनच्या नियमांवर लक्ष ठेवणे या सहा पथकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी लेनची शिस्त मोडणाऱ्या वाहनांचे ते चित्रीकरण करीत आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणांचे काय? पोलीस नसलेल्या ठिकाणांवर सर्रास नियम मोडले जात आहेत. खंडाळा बोरघाटात खालापूर टोलनाका ते खंडाळा बोगदा दरम्यान वाहतूक नियमांचे बिनदिक्कतपणे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळाले. अवजड वाहने मिळेल त्या लेनमधून घाट चढत होती .मुंबईकडे जाणारी वाहनेदेखील जी लेन मोकळी दिसेल, तेथून गाड्या भरधाव पळविताना दिसत होती. एकीकडे लेनचे नियम मोडले म्हणून दंड आकारणी सुरू असताना दुसरीकडे लेनचे नियम मोडण्याची वाहनचालकांची जणू स्पर्धा सुरू होती. वाहनचालकांची मानसिकता हे या मागचे मोठे कारण आहे. वाहनचालकांची मानसिकता बदलल्याशिवाय नियम परिणामकारक होणार नाहीत. तसेच दंडाची रक्कम नगण्य असल्याने त्या दंडाचा वाहनचालकांवर परिणाम होत नाही. ही दंडाची रक्कमदेखील वाढविण्याची गरज आहे.महामार्गावर निमयांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवत त्याद्वारे वाहनांचे चित्रीकरण व कारवाई केल्यास ती अधिक प्रभावी ठरू शकते. संपूर्ण महामार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत येऊन काही दुर्घटना घडल्यास तातडीने तेथे मदत पोहचू शकते. या दृष्टीने महाराष्ट्र शासन व रस्ते विकास महामंडळ यांनी विचार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)सीसीटीव्हीची आवश्यकता ४महामार्गावर निमयांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्याद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी. ४त्यामुळे लेनकटिंगचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण महामार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत येऊन काही दुर्घटना घडल्यास तातडीने तेथे मदत पोहचू शकते. प्रशासनाने याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे.