शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून प्रचंड गदारोळ, कामकाज गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 07:01 IST

मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजास आरक्षण आणि दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी घोषणाबाजी करून गोंधळ घातला.

मुंबई : मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजास आरक्षण आणि दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी घोषणाबाजी करून गोंधळ घातला. यात विधानसभेचे कामकाज चारदा तर विधान परिषदेचे दोनदा तहकूब करून नंतर ते दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. या गोंधळात काही सदस्यांनी राजदंड पळविला.मराठा आरक्षणाबाबत आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्नता असल्याचे दिसले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाचा अहवाल मांडण्याची मागणी केली, तर अजित पवार यांनी कायदेशीर वा घटनात्मक पेच निर्माण होणार असेल, तर अहवाल पटलावर ठेवू नये असे मत मांडले. अहवाल लोकांसमोर यावा, असे मत त्यांनी नंतर पत्रकारांकडे व्यक्त केले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले. अहवाल सभागृहात मांडल्यास त्याला कोर्टात आव्हान दिले जाईल, ही पवारांची भीती रास्त असल्याचे ते म्हणाले. नारायण राणे समितीचा अहवाल सभागृहात न मांडताच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते, असेही ते म्हणाले.अहवाल सभागृहात मांडावा की नाही यावर चर्चा होऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली व सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे स्पष्ट केले.धनगर समाजाला हे सरकार पहिल्याच दिवशी आरक्षण देणार होते त्याचे काय झाले, असा सवाल विखे, पवार यांनी केला. धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यासाठी राज्याने केंद्रीय आयोगाला शिफारस करावी, अशी मागणी गणपतराव देशमुख यांनी केली. विरोधकांच्या तोफेपासून वाचण्याची हीच संधी साधत मंत्री चंद्रकांत पाटील तशी शिफारस लवकरच करणार असल्याचे सांगितले.मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाविरोधी आमदारांनी बाहेर दुष्काळ व मराठा आरक्षणावरून धरणे धरले होते. विधानसभेतही मुस्लीम आरक्षणासाठी सदस्यांनी राजदंड उचलला. मुस्लिमांतील अनेक जातींना ओबीसींमध्ये आरक्षण आहे. ते मजबूत होण्यासाठी प्रयत्न करू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र