शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप

By यदू जोशी | Updated: August 18, 2025 10:04 IST

विशिष्ट लोकच सराईतासारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विशिष्ट लोकच सराईतासारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता राज्य माहिती आयोगाने अशांना चाप लावण्याची भूमिका घेत एका झटक्यात हजारो अर्ज फेटाळण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन महिन्यांत असे १० हजारांवर अर्ज/अपील फेटाळण्यात आले आहेत.

ठराविक माणसे राज्य माहिती आयुक्तांकडे हजारो अपील करतात. काही जण तर असे आहेत की त्यांचे एकेकाचे चार-पाच हजार अपील असतात. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी या अर्जांची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील अन्य सर्वच माहिती आयुक्तांनी त्यांना प्रतिसाद देत विशिष्ट हेतूने अर्ज करणाऱ्यांना आळा घालण्याची भूमिका घेतली आहे. माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी रोखठोक भूमिका ही घ्यावीच लागेल; तसे केले नाही तर जनतेचा या कायद्यावरील विश्वास उडेल, असा विचार समोर ठेवून आयोगाने आता कार्यवाही सुरू केली आहे.

सरकारी माहितीबाबत सरकारची मक्तेदारी मोडायची आणि सर्वसामान्यांसाठी माहिती खुली करायची म्हणून कायदा आणला गेला. आता या माहितीबाबत काही विशिष्ट लोक मक्तेदार बनणार असतील तर तेही होता कामा नये, हा आमचा उद्देश आहे. -राहुल पांडे, मुख्य माहिती आयुक्त.

अनिर्बंध दुरुपयोग

कायद्याचा माफक वापर करणे आवश्यक असूनही जाणीवपूर्वक अनिर्बंध, अवाजवी दुरुपयोग केला जात आहे. शासकीय कार्यालये/प्राधिकरणे यांचा बहुमूल्य वेळ, साधनसामग्री आणि शक्ती यामुळे अधिक प्रमाणात खर्ची पडून सर्वसामान्यांना ज्या सेवा देणे अभिप्रेत आहे त्या देता येत नाहीत. 

शासकीय कामकाजावर

गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्याच्या कार्यपद्धतीमुळे गरजवंत अर्जदारांवर अन्याय होतो, असे गंभीर निरीक्षण अनेक अपील फेटाळताना नोंदविण्यात आले आहे. 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार