शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘सेवा गाथा’ आता ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 20:42 IST

‘सेवा गाथा’ या नावाने मराठीमधील संकेतस्थळ लवकरच सुरु होणार असून नव्या वर्षामध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून  ‘सक्सेस स्टोरी’ सुद्धा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे. 

ठळक मुद्देरा. स्व. संघाची ‘सेवा गाथा’ आता ऑनलाईनमराठीमधील संकेतस्थळ : देशभरातील १ लाख ७० हजार सेवा प्रकल्पांची माहिती एका क्लिकवर

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागामार्फत देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या तब्बल १ लाख ७० हजार सेवा प्रकल्पांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.  ‘सेवा गाथा’ या नावाने मराठीमधील संकेतस्थळ लवकरच सुरु होणार असून नव्या वर्षामध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून  ‘सक्सेस स्टोरी’ सुद्धा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे.                संघाच्या स्थापनेनंतर देशभरामध्ये संघकार्यासाठी गेलेल्या अनेक प्रचारकांनी सेवा प्रकल्प सुरु केले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक, स्वावलंबन, महिला आदी क्षेत्रात काम सुरु आहे. वनवासी कल्याण आश्रमापासून शहरी भागातील दलित, उपेक्षित घटकांसाठीची शेकडो सेवा कार्यही सुरु आहेत. संघ विविध क्षेत्रात काम करतोय तशाच प्रकारे संघाकडून सामाजिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम सुरु असल्याची माहिती समाजासमोर यावी या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी तीन वर्षांपुर्वी या प्रकल्पांमधील  ‘सक्सेस स्टोरीज’ समाजापुढे याव्यात असे सुचविले होते. त्यानुसार, मराठीमध्ये हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.                या संकेतस्थळावर वंचित, उपेक्षित, वनवासी आणि दलिक घटकांसाठी सुरु असलेल्या प्रकल्पांसह नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवकांनी केलेल्या मदत आणि बचावकार्याचीही माहिती देण्यात येणार आहे. त्या त्या ठिकाणी छायाचित्रे असणार आहेत. यासोबतच चित्रकुटच्या नानाजी देशमुखांपासून छत्तीसगडच्या चांपा भागात क रणारे कात्रे गुरुजी, कर्नाटकच्या दुर्गम भागात काम करणारे अजित कुमार, उत्तराखंडच्या प्रलयानंतर पर्यावरणपूरक विकास मॉडेलचे प्रेरक आणि त्यामधून अनेक गावांची उभारणी करणारे डॉ. नित्यानंद, सेवा भारतीचे विष्णू कुमार, वनवासी कल्याण आश्रमाचे रमाकांत देशपांडे आदी संघ स्वयंसेवक आणि सेवाब्रतींची माहिती दिली जाणार आहे. 

  • यापुर्वी संघाने देशभर पसरलेल्या सेवा कार्यांचा आढावा घेणारे ‘सेवा सरितांचा अमृतकुंभ’ नावाचे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध केले होते. मात्र, या पुस्तकात काही मोजक्याच प्रकल्पांची माहिती होती. त्यामुळे अधिक व्यापक स्तरावर संघाच्या सेवा प्रकल्पांची माहिती या संकेतस्थळाद्वारे मिळणार आहे.

 

  • नेपाळ, मणिपूर, गुजरात, बिहार, केरळ, उत्तराखंड, राजस्थान आदी भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी संघ स्वयंसेवकांनी केलेल्या मदत व बचाव कार्याचीही माहिती सचित्र अपलोड करण्यात येणार आहे.

 

  • संघाच्या माध्यमातून देशभरात आरोग्य क्षेत्रात २५ हजार १३६, शिक्षण क्षेत्रात ८९ हजार ९२६, सामाजिक क्षेत्रात ३८ हजार ९०९, स्वावलंबन क्षेत्रात २० हजार ५४८ सेवा कार्य सुरु आहेत. संघ स्वयंसेवकांसोबतच सर्वसामान्य नागरिक, अभ्यासकांनाही या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळणार आहे.

 

  • रा. स्व. संघाच्या सेवा कार्यांमागील प्रेरणा, उद्देश, सकारात्मक परिणाम आणि बदल समाजासमोर यावेत, त्याची माहिती स्वयंसेवक, नागरिक आणि अभ्यासकांसह टीकाकारांनाही व्हावी याकरिता मराठीमधून सेवा गाथा हे नवे संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. संस्कार, व्यसनमुक्ती, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण, स्वावलंबन आदी क्षेत्रातील समाजकार्याची माहिती यानिमित्ताने सर्वांसमोर खुली होणार आहे. संघाबद्दलचे अनेक गैरसमजही त्यामधून दूर होऊन सकारात्मक प्रेरणा निर्माण होईल असा विश्वास आहे. 

- महेश करपे, कार्यवाह, पुणे महानगर, रा. स्व. संघ

टॅग्स :PuneपुणेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत