शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 22:11 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे.

RSS Plan For BJP : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वातील महायुती मैदानात आहे. दरम्यान, आता भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवस संघ धावून आला आहे. या आठवड्यासाठी संघाने विशेष तयारी केली आहे. संघाने एक रणनिती आखली असून, याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होणार आहे.

संघाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची विभागणी विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, या चार प्रांतांमध्ये करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, निवडणुकीसाठी चारही प्रांतातील प्रांताधिकाऱ्यांवर त्या-त्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्याकडे दोन विधानसभांची जबाबदारी देण्यात आली आहे.

काय आहे 1-2-3 चा फॉर्म्युला?संघाच्या रणनितीनुसार, विविध विभागातील अधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विभागातील दोन अधिकाऱ्यांना एका विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रणनीतीनुसार प्रत्येक विधानसभेत संघाचे 3 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे तिन्ही अधिकारी भाजप आणि सर्व सहयोगी संघटनांशी उत्तम समन्वय साधण्यासाठी रणनीती तर बनवतीलच, पण बूथ स्तरावर नाराज आणि निष्क्रिय स्वयंसेवकांना एकत्र करण्याचे कामही करतील.

संघाने एबीसीडी गटात सर्व बूथचे वाटप केलेमिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक बूथनुसार रणनीती बनवण्यात आली आहे. बूथ चार गट ABCD मध्ये विभागले आहेत. अ आणि ब हे बूथ पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे या बूथवर 100% मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक बूथवर भाजपशिवाय दोन टीम खासकरुन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे काम करणार आहेत. याशिवाय क गटात अशी बूथ ठेवण्यात आली आहेत, ज्यात पूर्वीपेक्षा 10 टक्के मते वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तर, नकारात्मक झोनमध्ये येणाऱ्या ड गटासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे.

विविध समाजातील प्रमुखांच्या भेटीलोकसभा निवडणुकीत जैन आणि मारवाडी मतदारांनी NOTA वर अधिक भर दिला होता, त्यामुळे संघाचे अधिकारी या समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुल्यांकनानुसार यावेळी जातीय राजकारणाला गती मिळू नये, यासाठी संघ विशेष काळजी घेत आहे. यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध जाती-समुदायातील प्रमुख व्यक्तींशी सातत्याने संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. 

हरयाणाच्या निकालातून घेतले धडेसंघ प्रत्येक बूथ स्तरावर 50-50 युवा परिषदा आणि महिला माता परिषदा आयोजित करत आहे. हरियाणातील धक्कादायक विजयामागे ग्राउंड झिरोवर मायक्रो मॅनेजमेंटची संघाची रणनीती असल्याचे मानले जात असले तरी हरियाणाची महाराष्ट्राशी तुलना करणे योग्य होणार नाही, असे संघाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य आहे आणि इथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तिथल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे संघाने येथे वेगळ्या पद्धतीने जनजागृती मोहीम सुरू केली असून, वेगळ्या रणनीतीवर काम केले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा