शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:48 IST

RSS Chief Mohan Bhagwat: सगळ्या विविधतेने नटलेल्या मुळाशी एकच तत्त्व आहे, तेच ओळखून संघ काम करतो, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

RSS Chief Mohan Bhagwat: कुटुंबात माणसाची घडण होते, माणसाचे जीवन घडते. कुटुंबात संस्काराची जी सामग्री मिळते, ज्या अनुशासनात तो वाढतो, त्याचा पुढे जीवनात खूप उपयोग असतो. त्यामुळे पूर्वजांचे स्मरण कृतज्ञतेने करायचेच असते. आजकाल केले जाते, ते सांगावे लागते. पूर्वा लोक करत होते. परंतु, आता कुणी केले तर ते उदाहरण होते. हा काळाचा महिमा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

RSSचे सरसंघचालक मोहन भागवत एका कार्यक्रमात बोलत होते. गेले दोन ते तीन दिवस मला सातत्याने दोन शब्द प्रामुख्याने ऐकायला मिळत आहेत. पहिला म्हणजे करुणा आणि दुसरा शब्द आहे आपलेपणा. एका शब्दांत संघाचे वर्णन करायचे असेल, तर त्यासाठी आपलेपणा हा शब्द आहे. कारण संघ हिंदू संघटन करून काय करतो, हा आपलेपणा वाळत चाललेला आहे, त्याने पुन्हा ओलावा धरावा, हे करतो. कारण सगळे जग त्यावर चालले आहे. सगळ्या विविधतेने नटलेल्या मुळाशी एकच तत्त्व आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते एकच तत्त्व आहे हे ओळखून वागणे, म्हणजेच आपलेपणा आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे, त्याची आठवण संघ करून देतो

आपण एकाच तत्त्वाचे निरनिराळे आविष्कार आहोत. म्हणजे आपण सगळे एकमेकांचे आहोत. आपला योगायोगाने आलेले हे सानिध्य नाही. आपला संबंध आहे, अशी जाणीव ठेवून मनुष्य वागतो, तेव्हा तो मनुष्य म्हणवतो. पशुंमध्ये असे वागणे नसते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, तो विचार करतो आणि त्याच्यामुळे तो आहे त्याच्यापेक्षाही चांगला होऊ शकतो. बुद्धी उलटी चालवली तर आहे त्याच्यापेक्षा वाईटही होऊ शकतो. तो वाईट होत नाही, याचे कारण त्याला आपलेपणा जाणवतो. समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे, त्याची आठवण संघ करून देतो, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, हा आपलेपणा ओळखायचा हे जीवनाचे एक कर्तव्य आहे आणि आपलेपणा ओळखून आपलेपणाने वागायचे हे दुसरे कर्तव्य आहे. आम्ही संघात असंच करतो, ही गोष्ट व्हायला पाहिजे. संघाचे काम सेवाभावातून आपलेपणा निर्माण करते. तुम्ही काम सुरू करा, संघ तुमच्याबरोबर येईल अशी ही पद्धत आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत