शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणा- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 17:16 IST

भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे.

ठळक मुद्देभारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे. भाजपावाले संविधान मोडायला निघाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाला मानत नाही आरएसएसमध्ये अनेक स्लीपर सेल्स आहेत.

लातूर- भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे. भाजपावाले संविधान मोडायला निघाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाला मानत नाही. आरएसएसमध्ये अनेक स्लीपर सेल्स आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा काँग्रेसनं तो ड्राफ्ट आम्हाला द्यावा, तरच काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा विचार करू.ओबीसी आणि मराठ्यांमध्ये विस्तव जात नाही. ओबीसींच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका आम्हाला मान्य नाही, असंही ओवैसी म्हणाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहेत. तसेच केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरही प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या सरकारमध्ये बिनसलं आहे. ममता बॅनर्जींची भूमिका योग्य आहे. ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला हस्तक्षेप करून देणार नसल्याचं केंद्राला आधीच सांगितलं आहे. त्यामुळे केंद्रानं राज्यांच्या अधिकारांत हस्तक्षेप करू नये. काँग्रेसला आघाडीसाठी आम्ही अनेक पर्याय दिले.आमचा किंवा एमआयएमचा पंतप्रधान होणार नाही. पंतप्रधान हा काँग्रेसचाच होणार आहे. दलितांमध्ये भविष्यात चांगला नेता मला दिसत नाही. महाराष्ट्राच्या नेत्यांनी निवडणुकांसाठी आराखडा तयार करायला हवा. त्यामुळे त्यांना काँग्रेसची खरी ताकद कळेल. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही. कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायचं हे अजून नक्की झालेलं नाही.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर