शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:10 IST

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते.

पुणे  -  राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील १८ हजार ८२१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. राज्यातील शेतकºयांची एफआरपी ३ हजार ६०७ कोटी रुपये रक्कम अजूनही थकीत आहे, असे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, एप्रिलअखेरीस राज्यातील साखर कारखान्यांनी ९४९ लाख टन एवढ्या उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यावर देय असलेल्या एफआरपीच्या रक्कमेपैकी ८५ टक्के रक्कम एप्रिल अखेरीस शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. मात्र,अद्यापही राज्यातील शेतकºयांची ३ हजार ६०७ कोटी एफआरपीची रक्कम थकित आहे. शेतकºयांना ही रक्कम तत्काळ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या सॉफ्टलोन योजनेतून राज्यातील कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे. कर्जाची रक्कम मिळताच थकीत एफआरपी आणखी कमी होईल.एप्रिल अखेरपर्यंत उसाच्या एफआरपीची शंभर टक्के रक्कम ४३ साखर कारखान्यांनी शेतकºयांना दिली आहे. तसेच ८० टक्क्यांहून अधिक रक्कम देणाºया कारखान्यांची संख्या ८० असून, ४२ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एवढी रक्कम शेतकºयांना दिली आहे. त्याचप्रमाणे शून्य ते ६० टक्क्यापर्यंत एफआरपी देणाºया कारखान्यांची संख्या ३० एवढी आहे.सुमारे १५ दिवसांपूर्वी शेतकºयांना एफआरपीचे चार हजार ३२४ कोटी रुपये देणे बाकी होते. त्यातील काही कारखान्यांनी शेतकºयांच्या बँक खात्यावर ७१७ कोटी रुपये जमा केले आहेत. २०१८-१९ या उस गाळप हंगाम मध्ये प्रथमच एफआरपीचा देय आकडा चार हजार कोटी रुपयांच्या खाली आला आहे, असेही शेखर गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेbusinessव्यवसाय