कांदा भावात 100 रु पयाची घसरण ; शेतकरी चिंतेत...
By Admin | Updated: May 18, 2016 20:16 IST2016-05-18T20:16:10+5:302016-05-18T20:16:10+5:30
कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे

कांदा भावात 100 रु पयाची घसरण ; शेतकरी चिंतेत...
ऑनलाइन लोकमत
येवला, दि. १८ - येवला बाजार समितीत कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बुधवारी कांद्याचे बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहे. कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे आज ३०० ते ९१२ रूपये प्रतिक्विंटल राहिले.
गेल्या दीड महिन्यापासून घसरलेला कांदा बाजारभाव कांद्याचे उत्पादन अधिक वाढल्याने बुधवारी आणखी १०० रु पयांनी घसरले.
तालुक्यात पाणी नाही परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी ठोका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.आता खर्च तर करून बसलो परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपटणे घेण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषीमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पध्दती कांद्याच्या बाबत का मुग गिळून बसते असा सवाल विजय कदम यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्याचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसतांना शेतकर्यांना विकावा लागतो या बाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. हि वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले कि काय ? अशी प्रतिक्र ीया शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी दिली.
---------
येवला तालुक्यात पाणीच नाही भयावह दुष्काळ आहे. पोट भरण्यासाठी व मुलीबाळी लग्नाला आल्या त्यांची शिरावर अक्षदा टाकण्याच्या काळजीत दुसर्या तालुक्यात जावून कष्टाने कांदा पिकवला आहे. पण कमालीचे भाव घसरल्याने आम्ही धास्तावलो आहे. किमान १५०० रु पये प्रतीक्विंटल बाजारभाव मिळाला तरच परवडणार आहे.अन्यथा सध्याच्या परिस्थितीत कांदा हा आतभट्टीचा व्यवसाय ठरत आहे.
-अशोक खोकले,शेतकरी आडगावचोथवा