राजभवनातील उपमुकादमाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:59 IST2017-02-26T01:59:13+5:302017-02-26T01:59:13+5:30

महिला कर्मचाऱ्यांवर अश्लील टिकाटिपणी करणाऱ्या राजभवनातील उपमुकादमाला मलबार हील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम गोविंद बदाथे (५१) असे त्याचे नाव आहे.

The royal house is arrested | राजभवनातील उपमुकादमाला अटक

राजभवनातील उपमुकादमाला अटक

मुंबई : महिला कर्मचाऱ्यांवर अश्लील टिकाटिपणी करणाऱ्या राजभवनातील उपमुकादमाला मलबार हील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम गोविंद बदाथे (५१) असे त्याचे नाव आहे.
मलबार हील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला कक्षसेवकांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. त्या गेल्या सात वर्षांपासून बदाथे याच्या हाताखाली काम करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कामगार भरतीवरुन त्यांच्यात वाद सुरु होता. त्यामुळे बदाथे त्यांना अपमानास्पद वागणूक देत होता. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार दिली. मात्र त्याकडे वरिष्ठांनी समजूत काढून वाद मिटवला. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे स्वरुपात होती. बदाथे याने अश्लील शेरेबाजी सुरु केल्याने दोघींनीही मलबार हील पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज पोलिसांना दिला. त्या अर्जावरुन मलबार हील पोलिसांनी बदाथे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती मलबार हील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The royal house is arrested