मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त

By Admin | Updated: October 15, 2014 04:05 IST2014-10-15T04:05:30+5:302014-10-15T04:05:30+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी होणारी मतदान प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी ठाणे आणि पालघर जिल्हा सज्ज झाला आहे. २० हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

Rough settlement for voting | मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त

मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त

पंकज रोडेकर, ठाणे
विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी होणारी मतदान प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी ठाणे आणि पालघर जिल्हा सज्ज झाला आहे. २० हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत १६ हजार ५८५, तर पालघरमधील ६ मतदारसंघांत ३ हजार ५५३ पोलिस तैनात आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण २९६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदानासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
ऐरोलीमध्ये सर्वाधिक ४ लाख ८ हजार ५० मतदार आहेत. याच मतदारसंघात २ लाख ३३ हजार ६६७ पुरुष मतदार आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ८५ हजार ६६३ महिला मतदार आहेत. सर्वात कमी मतदार शहापूर मतदारसंघात २ लाख ३५ हजार २७४ आहेत.
जिल्ह्यातील कल्याण (प.), अंबरनाथ, मुंब्रा-कळवा आणि उल्हासनगर या चार मतदारसंघांत दोन बॅलेट युुनिट लावण्यात आले आहेत. अन्य १४ मतदारसंघांत एक बॅलेट युनिट लावण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील ६ हजार १४५ मतदान केंद्रांवर एकूण ९ हजार ४४० बॅलेट युनिट लावण्यात आले आहेत.

Web Title: Rough settlement for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.