घुमू लागले ढोल-ताशांचे आवाज

By Admin | Updated: June 29, 2014 23:42 IST2014-06-29T23:42:36+5:302014-06-29T23:42:36+5:30

लाडक्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांचा नैवेद्य दाखविण्याकरिता तरुणाईची लगबग सुरू झाली आहे.

Rotating drum-cards sound | घुमू लागले ढोल-ताशांचे आवाज

घुमू लागले ढोल-ताशांचे आवाज

>पुणो : लाडक्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांचा नैवेद्य दाखविण्याकरिता तरुणाईची लगबग सुरू झाली आहे. नदीपात्रतील मंगल कार्यालये आणि मोकळ्या मैदानांतून ढोलांचा आवाज घुमू लागला आहे. पथकांच्या सराव समारंभांचे उद्घाटनही जल्लोषात होत आहे. परंतु पथकांनी किती वेळ सराव करावा, आवाजाची पातळी काय असावी, कुठे सराव करावा याबाबत पोलिसांकडून कोणतीही नियमावली घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पथकांतील वादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
गणोशोत्सवापूर्वी दोन महिने ढोल-ताशा पथकांचे सराव सुरू होतात. शिवगजर्ना, शिवमुद्रा, रूद्रगजर्ना, शिवप्रताप, महाशक्तीसारख्या अनेक पथकांचे सराव सुरू झाले आहेत. नदीपात्रतील मंगल कार्यालयांच्या जागेत आणि उपनगरांतील मैदानांवर वादक सराव करीत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर पथकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाऊस नसताना जास्तीत जास्त वेळ सराव करण्याचा प्रयत्न पथकप्रमुखांकडून केला जात आहे.
काही पथकांच्या सरावाला सुरुवात झाली असली, तरी बहुतांश पथकांतील वादकांचे फेसबुक, व्हॉट्सअॅपवरून एकत्रीकरण करणो सुरू आहे. 
यंदा कुठे सराव करायचा, किती वादकांना प्रवेश द्यायचा, नवे प्लॅन्स अशा अनेक विषयांवरील चर्चा रात्रीच्या वेळी पथकांच्या कट्टय़ावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील गणोशोत्सवाची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, पथकांची लगबग सुरू झाली आहे.  (प्रतिनिधी)
 
4मंगल कार्यालयांचे लॉन्स अनेक कार्यक्रमांना भाडय़ाने देण्यात आलेले असतात. पुढील दोन महिन्यांत नाईलाजाने पथकांना सराव अनेकदा थांबवावा लागतो. त्यामुळे सुमारे 6क् दिवस आधी बहुतांश पथके सरावाला सुरुवात 
करतात. 
4मागील वर्षी पथकांच्या सरावाच्या वेळा, एका मंगल कार्यालयात किती पथकांनी सराव करावा, आवाजाची मर्यादा आणि ढोल-ताशांची संख्या याबाबत पोलीस व पथके यांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे आत्तापासून पथकांची बैठक घेऊन पोलिसांनी नियमावली आखून दिल्यास पुढे होणारे वाद टाळता येऊ शकतील.
 
पथक बोलावण्याकरिता गणोशोत्सव मंडळांची लगबग
4पारंपरिक पद्धतीने गणोशोत्सव साजरा करण्याकरिता बहुतांश गणोशोत्सव मंडळे पुढाकार घेत आहेत. 
4स्पिकर्सच्या भिंतींपेक्षा ढोल-ताशा या पारंपरिक कलेला जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. त्यामुळे आपल्या मंडळाच्या गणपतीसमोर विसजर्न मिरवणुकीत अमुक एका पथकाने वादन करावे, याकरिता मंडळातील कार्यकत्र्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Web Title: Rotating drum-cards sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.