शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत रस्सीखेचीमुळे खातेवाटपाचे घोडे अडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:47 IST

गृह खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

- अतुल कुलकर्णी मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी पक्षांतर्गत वादांमुळे खातेवाटप लांबणीवर पडले आहे. गृह खात्यावरून राष्ट्रवादीत, तर काँग्रेसमध्ये महसूल खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे समजते.कोणत्या पक्षाकडे कोणते खाते, हे आधीच ठरलेले आहे. मात्र कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत जोरदार ओढाताण आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना गृह व दिलीप वळसे यांना कामगार खाते द्यायचे ठरविले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन, जयंत पाटील यांना जलसंपदा, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय, नवाब मलिक यांना राज्य उत्पादन शुल्क आणि वक्फ, जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण, राजेंद्र शिंगणे यांना वैद्यकीय शिक्षण, तसेच राजेश टोपे यांना उच्च व तंत्रशिक्षण ही खाती दिली जातील, असे समजते.मात्र या खातेवाटपावरून मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अनिल देशमुख यांना गृह खाते देणे कोणालाच मान्य नाही. जयंत पाटील यांनी गृह खाते घ्यावे, असा आग्रह शरद पवार यांनी केला होता; पण त्यांना जलसंपदा खाते हवे आहे. नवाब मलिक यांनी कामगार खात्यावर दावा सांगितला आहे. उत्पादन शुल्क खाते वळसे पाटील यांना देण्यास तयार आहेत. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायऐवजी जलसंपदा व सार्वजनिक आरोग्य हवे आहे. भुजबळही अन्न व नागरी पुरवठा खात्यावर समाधानी नसल्याचे वृत्त आहे.काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, दुग्धविकास व पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण ही खाती असतील. महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहील, असे कळते. अशोक चव्हाण यांना ऊर्जा वा सार्वजनिक बांधकाम खाते हवे आहे, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत यांनी बांधकाम विभागावर दावा सांगितला आहे.शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांना पर्यावरण व सांस्कृतिक कार्य खाते मिळेल, हे जवळपास नक्की आहे. मंत्रिपदे न मिळाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेत नाराजी आहे. आपले बंधू सुनील राऊत यांना मंत्री न केल्याने शपथविधीला गैरहजर राहून शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी दाखवून दिली. प्रणिती शिंदे यांना मंत्री न केल्याने सोलापूर काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पश्चिम विदर्भाला स्थान न दिल्याने तेथील लोकांमध्येही नाराजी आहे.संग्राम थोपटे यांना मंत्री न केल्यामुळे पुण्याच्या भोर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्तेही संतापले आहेत. तेथील काही नगरसेवक तर राजीनामा देण्याची भाषा करीत आहेत. माजलगावचे (बीड) राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेही त्यांना मंत्री न केल्याने संतापल्याचे बोलले जाते. ते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आपली नाराजी बोलून दाखवणार असल्याचे समजते.मंगळवारी तिढा सुटेलप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे सर्व मंत्री, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच पक्षांतर्गत खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस